Maharashtra Assembly Election : रत्नागिरीतील गड शिवसेना उबाठा राखणार की…?

78
Maharashtra Assembly Election : रत्नागिरीतील गड उबाठा शिवसेना राखणार की…?
  • सचिन धानजी, मुंबई

रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील रत्नागिरी जिल्ह्यात चिपळूण, रत्नागिरी आणि राजापूर हे तीन विधानसभा मतदारसंघ तर रायगड लोकसभा मतदारसंघातील दापोली आणि गुहागर या दोन विधानसभा क्षेत्रांचा समावेश रत्नागिरी जिल्ह्यात येत आहे. या सर्व मतदारसंघात विद्यमान आमदार मंत्री उदय सामंत, आमदार भास्कर जाधव, राजन साळवी यांच्यासह उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत, योगेश कदम आदी उमेदवार निवडणूक रिंगणात आहे. (Maharashtra Assembly Election)

राजन साळवींसमोर किरण सामंतांचे आव्हान

राजापूर विधानसभा मतदारसंघात विद्यमान आमदार राजन साळवी यांच्यासमोर भैया सामंत अर्थात उद्योगमंत्री यांचे बंधू किरण सामंतांचे आव्हान आहे. सिंधुदुर्ग रत्नागिरी लोकसभा मतदारसंघाची जागा शिवसेनेला मिळावी आणि आपल्याला उमेदवारी मिळावी म्हणून किरण सामंतांनी जोरदार मोर्चेबांधणी केली होती. परंतु ही जागा भाजपाला सोडून नारायण राणे यांना उमेदवारी दिल्यामुळे नाराज किरण सामंतांचे पुनर्वसन राजापूर मतदारसंघात उमेदवारी देऊन केले आहे. राजन साळवी हे सन २००९ पासून सलग तीन वेळा निवडून आलेले आहेत. मात्र, किरण सामंत यांचेही प्रस्थ तेवढेच मोठे असल्याने यंदाची निवडणूक ही तुल्यबळ होणार असल्याचे बोलले जात आहे. साळवी यांच्यासमोर किरण सामंत यांच्यासह काँग्रेसचे बंडखोर अविनाश लाड तसेच संजय यादवराव हे अपक्ष म्हणून निवडणूक रिंगणात उभे आहेत. त्यामुळे हे अपक्ष नक्की कुणाची आणि किती मते मिळवतात यावर लक्ष असेल. (Maharashtra Assembly Election)

(हेही वाचा – Assembly Election : हिंगोली जिल्ह्यातील तिन्ही मतदारसंघात मत विभाजनाची भीती; अपक्षांनी केली डोकेदुखी)

रत्नागिरीत उदय सामंतांपुढे बाळ माने उभे

रत्नागिरी विधानसभा मतदारसंघात उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या विरोधात उबाठा शिवसेनेने बाळ मानेंना उभे केले आहे. आजवर उदय सामंतांची विभागातील सर्व जबाबदारी किरण सामंत यांच्यावर असायची. परंतु यंदा किरण सामंत हे राजापूर मतदारसंघातून निवडणूक रिंगणात उतरल्याने उदय सामंत यांना अधिक लक्ष देवून काम करावे लागणार आहे. बाळ माने हे पूर्वी भाजपामध्ये होते, पण काही दिवसांपूर्वी त्यांनी उबाठा शिवसेनेत प्रवेश केला होता. त्यामुळे भाजपातून आलेल्या बाळ मानेंना उदय सामंत यांच्या विरोधात उभे केल्याने यंदा सामंतांपुढे मोठे आव्हान असून सामंत ही निवडणूक कशी हाताळतात आणि विजय प्राप्त करतात याकडे सर्वांचे लक्ष आहे. (Maharashtra Assembly Election)

चिपळूणमध्ये निकम विरुद्ध प्रशांत यादव

चिपळूण विधानसभा मतदारसंघामध्ये विद्यमान राष्ट्रवादी काँग्रेस विरोधात आमदार शेखर निकम यांच्या शरद पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने प्रशांत यादव यांचे प्रमुख आव्हान आहे. त्यामुळे या मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस अशीच लढत पहायला मिळणार आहे. (Maharashtra Assembly Election)

(हेही वाचा – सुनेला टोमणे मारणे, टीव्ही पाहू न देणे क्रूरता नाही; Bombay High Court चा निर्णय)

दापोलीमध्ये कदम विरुद्ध कदम

दापोली विधानसभा मतदारसंघात विद्यमान आमदार योगेश कदम यांच्या विरोधात उबाठा शिवसेनेने संजय कदम यांना निवडणूक रिंगणात उतरवले आहे. या मतदारसंघात दोन योगेश कदम आणि दोन संजय कदम हे निवडणूक रिंगणात उतरल्याने नावाशी साधर्म्य असलेले डुप्लिकेट उमेदवार निवडणूक रिंगणात असल्याने ते किती मते पारड्यात पाडून घेतात याकडे सर्वांचे लक्ष आहे. (Maharashtra Assembly Election)

गुहागरमध्ये भास्कर जाधवांसमोर राजेश बेंदाल यांचे आव्हान किती?

गुहागर विधानसभा मतदारसंघातून उबाठा शिवसेनेचे विद्यमान आमदार भास्कर जाधव यांच्यासमोर शिवसेनेने राजेश बेंदाल आणि मनसेचे प्रमोद गांधी यांचे आव्हान आहे. भास्कर जाधव हे आपल्याला कुणीच हरवू शकत नाही या अविर्भावात असून शिवसेना आणि मनसेचे आव्हान किती हे निवडणूक निकालावरून स्पष्ट होईल. (Maharashtra Assembly Election)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.