महाराष्ट्र विधानसभेच्या 288 जागांसाठी बुधवारी मतदान झाले. त्यानंतर शनिवारी झालेल्या मतमोजणीत सत्ताधारी महायुतीची मोठ्या विजयाकडे वाटचाल सुरू झाली आहे. सुरुवातीच्या कलांमध्ये महायुतीने सर्वाधिक 218 जागांवर आघाडी घेतली असून, त्यात भाजपाने सर्वाधिक 130, शिवसेना 55 व राष्ट्रवादी काँग्रेसने 40 जागांवर आघाडी घेतली आहे. तर विरोधी बाकावरील महाविकास आघाडीने 50 जागांवर आघाडी घेतली आहे. त्यात काँग्रेसने 19, ठाकरे गटाने 20 तर शरद पवार गटाने 11 जागांवर आघाडी घेतली आहे. विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसला (Nationalist Congress Party) मिळालेल्या चमकदार कामगिरीमुळे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) व त्यांच्या सहकाऱ्यांचा चेहरा चांगलाच खुलला आहे. (Maharashtra Assembly Election Result 2024)
Maharashtra Chooses Pink 🙏🏻#MaharashtraElectionResult pic.twitter.com/0LqcGWwh3A
— Ajit Pawar (@AjitPawarSpeaks) November 23, 2024
अजित पवार यांनी एक्सवर लिहिलेल्या पोस्टमध्ये म्हणाले की, या निवडणुकीतील आपल्या कामगिरीवर आनंद व्यक्त केला आहे. जनतेने गुलाबी रंगाला पसंती दर्शवल्याचे म्हटले आहे. त्यांनी पोस्ट केलेल्या एक्समध्ये त्यांच्या हातात गुलाबी रंगाची फुलेही दिसून येत आहेत. अजित पवारांनी संपूर्ण निवडणुकीत प्रचाराची एक खास रणनीती आखली होती. त्यांनी संपूर्ण प्रचारात गुलाबी रंगाचे जॅकेट परिधान केले होते. गुलाबी रंगाच्या गाड्या, गुलाबी रंगाच्या पोस्टर्सचाही त्यांनी चपखल वापर करून महिला वर्गाला आपल्याकडे खेचण्यात यश मिळाले होते. त्यामुळेच आता अजित पवार यांनी महाराष्ट्राने गुलाबी रंग निवडला असे ट्विट केले आहे.
(हेही वाचा – Maharashtra Assembly Election Result 2024: ‘या’ दिवशी होणार महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाचा शपथविधी ?)
सहकाऱ्यांसोबत केला आनंद व्यक्त
या निकालामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेसला स्फुरण चढले आहे. विशेषतः अजित पवार यांचाही आत्मविश्वास चांगलाच दुणावला आहे. यामुळे त्यांनी मुंबई येथील आपल्या देवगिरी बंगल्यावर (Devagiri Bungalow) राष्ट्रीय कार्याध्यक्ष तथा खासदार प्रफुल्ल पटेल व राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष तथा खासदार सुनील तटकरे (Sunil Tatkare) यांच्यासोबत आनंद व्यक्त केला.
निवडणुकीत भाजपला घवघवीत यश
विधानसभा निवडणुकीपूर्वी देवेंद्र फडणवीस दिल्लीला जाण्याची चर्चा सुरू होती. लोकसभा निवडणुकीतील भाजपाची हाराकिरी व मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वातील मराठा आरक्षणाच्या आंदोलनामुळे ही शक्यता मोठ्या प्रमाणात वाढली होती. पण विधानसभा निवडणुकीत भाजपला घवघवीत यश मिळाल्यामुळे देवेंद्र फडणवीस यांचे नेतृत्व अधिकच झळाळून निघाले आहे.
हेही पाहा –
Join Our WhatsApp Community