Live : Maharashtra Assembly Election Result 2024 : पाचव्या फेरीत वरळी मतदारसंघात आदित्य ठाकरे पिछाडीवर

229
Maharashtra Assembly Election Result 2024

वरळी मतदारसंघात मतमोजणीच्या पाचव्या फेरीत उबाठा नेते आदित्य ठाकरे पिछाडीवर आहेत. वरळीमध्ये शिवसेनेचे मिलिंद देवरा यांना १८२०४ मते मिळाली आहेत. ते ५९७ मतांना आघाडीवर आहेत. आदित्य ठाकरे यांना १७६०७ मते मिळाली असून ते दुसऱ्या स्थानी आहेत. येथे मनसेचे संदीप देशपांडे हेही निवडणूक लढवत आहेत. त्यांना ८२८२ मते मिळाली आहेत. मतमोजणीच्या एकूण १७ फेऱ्या होणार आहेत.

माहीममध्ये उबाठाचे महेश सावंत आघाडीवर

माहीम विधानसभेत उबाठाचे महेश सावंत यांनी पाचव्या फेरीत ७६३६ मतांनी आघाडी घेतली आहे. त्यांना १६८४६ मते मिळाली आहेत. दुसऱ्या स्थानी शिवसेनेचे सदा सरवणकर आहेत, त्यांना ९२१० मते मिळाली आहेत. तर मनसे प्रमुख राज ठाकरे यांचा मुलगा अमित ठाकरे यांना ६६४२ मते मिळाली आहेत.

राज्यातील प्रमुख नेत्यांचे काय आहे मताधिक्य ?

कोपरी पाचपाखाडी येथून एकनाथ शिंदे पाचव्या फेरीत आघाडीवर – एकूण 30629 मते, नागपूर दक्षिण पश्चिममधून देवेंद्र फडणवीस आघाडीवर आहेत, त्यांना सहाव्या फेरीत 27431 मते मिळाली आहेत, तर बारामती मतदारसंघात अजित पवार यांना पाचव्या फेरीत ४५०२६ मते मिळाली आहेत. ते आघाडीवर असून युगेंद्र पवार यांना २३६७७ मते मिळाली आहेत. जळगावमधून गुलाबराव पाटील आठव्या फेरीत ४६०८९ मते आघाडीवर आहेत. कर्जत जामखेडमधून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे रोहित पवार पिछाडीवर आहेत. तेथे भाजपाचे राम शिंदे पाचव्या फेरीत आघाडीवर आहेत. त्यांना २४९८४ मते आहेत, तर रोहित पवार यांना २३९४२ मते आहेत.

महायुती बहुमताच्या दिशेने; २०४ जागांवर आघाडीवर

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी झालेल्या मतदानानंतर मतमोजणी सुरू आहे. सकाळी १० वाजेपर्यंतच्या आकडेवारीनुसार महायुती २०४ जागांवर आघाडीवर आहे, तर महाविकास आघाडी ४७ जागांवर आघाडीवर आहे. भाजपा १०९ जागांवर, शिवसेना ५६ जागांवर, तर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट ३४ जागांवर आघाडीवर आहे. महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस १९ जागांवर, उबाठा १९ जागांवर, तर शरद पवार गट ९ जागांवर आघाडीवर आहे.

काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात, विजय वडेट्टीवार, पृथ्वीराज चव्हाण आणि विश्वजित कदम हे पिछाडीवर असल्याचे सुरुवातीच्या फेरीतून समोर आले आहे.

मतमोजणीला सुरुवात; पोस्टल मतांचा कल लवकरच येणार हाती

विधानसभा निवडणुकीचे निकाल (Maharashtra Assembly Election Result 2024) २३ नोव्हेंबर रोजी जाहीर होत आहेत. राज्यात 4,136 उमेदवारांनी निवडणूक लढवली. राज्यातील 9 कोटी 70 लाख 25 हजार 119 मतदारांसाठी 1,00,427 मतदान केंद्रांवर मतदानाची व्यवस्था केली होती. मतदारांनी यंदा विक्रमी मतदान केले. त्यामुळे राज्यात महायुती (Mahayuti) आणि महाविकास आघाडी (MVA) यांच्यापैकी कोणाची सरशी होणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. (Maharashtra Assembly Election Result 2024)

८ वाजता राज्यभरात मतमोजणीला सुरुवात झाली असून लवकरच पोस्टल मतांचा कल हाती येणार आहे. राज्यातील ९ कोटी ७० लाख २५ हजार ११९ मतदारांपैकी ६ कोटी ४० लाख ८८ हजार १९५ मतदारांनी मतदानाचा हक्क २० नोव्हेंबरला बजावला होता. मतदानाची टक्केवारी ६६.०५ इतकी होती. १५८ लहान-मोठे पक्ष आणि अपक्ष असे मिळून ४ हजार १३६ उमदेवारांच्या भाग्याचा फैसला होणार आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.