विधानसभा निवडणुकीचे निकाल (Maharashtra Assembly Election Result 2024) आज (२३ नोव्हें.) जाहीर होत आहे. राज्यात 4,136 उमेदवारांनी निवडणूक लढवली. राज्यातील 9 कोटी 70 लाख 25 हजार 119 मतदारांसाठी 1,00,427 मतदान केंद्रांवर मतदानाची व्यवस्था केली होती. मतदारांनी यंदा विक्रमी मतदान केले. त्यामुळे राज्यात महायुती (Mahayuti) आणि महाविकास आघाडी (MVA) यांच्यापैकी कोणाची सरशी होणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. (Maharashtra Assembly Election Result 2024) विधानसभा निवडणुकांचे निकाल हाती येत आहेत.
एक है तो ‘सेफ’ है !
मोदी है तो मुमकिन हैं ! #Maharashtra #महाराष्ट्र— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) November 23, 2024
दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघातून उमेदवार असलेले राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हे प्रत्यक्ष सहाव्यांदा निवडनुकीच्या मैदानात उतरले आहेत. तर पहिल्या कलापासून फडणवीस हे आघाडीवर असल्याचे चित्र होते. तर त्यानंतर जसजशी आकडेवारी पुढे येत गेली, त्यानुसार देवेंद्र फडणवीसांच्या (Devendra Fadnavis) विजयी अश्वाची घोडदौड सुरूच असल्याची चित्र होते.
प्रचारसभेत गाजलेला मुद्दा ट्विट
देवेंद्र फडणवीसांनी (Devendra Fadnavis) तेराव्या फेरीअखेरीस आपल्या दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघातून तब्बल 20919 मतांनी आघाडी कायम ठेवत विजय मिळवला. विजयानंतर फडणवीसांनी प्रचारसभेत गाजलेला मुद्दा ट्विट केला आहे. एक है तो ‘सेफ’ है ! मोदी है तो मुमकिन हैं ! असं फडणवीसांनी म्हटलं आहे.
हेही पहा-
Join Our WhatsApp Community