Maharashtra Assembly Election Result 2024: देवेंद्र फडणवीसांचा विजय निश्चित; सलग सहाव्यांदा करणार प्रतिनिधित्व

38
Maharashtra Assembly Election Result 2024: देवेंद्र फडणवीसांचा विजयानंतर पुन्हा एकदा एक हैं तो ‘सेफ’ हैं! चा नारा!
Maharashtra Assembly Election Result 2024: देवेंद्र फडणवीसांचा विजयानंतर पुन्हा एकदा एक हैं तो ‘सेफ’ हैं! चा नारा!

विधानसभा निवडणुकीचे निकाल (Maharashtra Assembly Election Result 2024) आज (२३ नोव्हें.) जाहीर होत आहे. राज्यात 4,136 उमेदवारांनी निवडणूक लढवली. राज्यातील 9 कोटी 70 लाख 25 हजार 119 मतदारांसाठी 1,00,427 मतदान केंद्रांवर मतदानाची व्यवस्था केली होती. मतदारांनी यंदा विक्रमी मतदान केले. त्यामुळे राज्यात महायुती (Mahayuti) आणि महाविकास आघाडी (MVA) यांच्यापैकी कोणाची सरशी होणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. (Maharashtra Assembly Election Result 2024) विधानसभा निवडणुकांचे सुरूवातीचे निकाल हाती येत आहेत.

(हेही वाचा-Maharashtra Assembly Election Result 2024: “उद्धव ठाकरेंना महायुतीत यायचे असेल तर…”, चंद्रकांत पाटील काय म्हणाले ?)

मतमोजणीच्या सुरुवातीच्या तीन तासांमध्ये महायुतीला (Mahayuti) प्रचंड मोठे यश मिळताना दिसत आहे. दरम्यान, राज्यासह देशाचे लक्ष लागून राहीलेल्या अतिशय महत्वाच्या नागपूर दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघातून मोठी बातमी समोर आली आहे. देवेंद्र फडणवीसांनी (Devendra Fadnavis) नागपूर दक्षिण-पश्चिम मतदारसंघातून सहाव्यांदा आपला विजय निश्चित केला आहे.

(हेही वाचा-Maharashtra Assembly Election Result 2024: कोकणात राणे पुत्रांची स्थिती काय?)

दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघातून उमेदवार असलेले राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हे प्रत्यक्ष सहाव्यादा निवडनुकीच्या मैदानात उतरले आहेत. तर पहिल्या कलापासून फडणवीस हे आघाडीवर असल्याचे चित्र आहे. तर त्यानंतर जसजशी आकडेवारी पुढे येत गेली त्यानुसार देवेंद्र फडणवीसांच्या (Devendra Fadnavis) विजयी आश्वाची घोडदौड सुरूच असल्याची चित्र आहे.

(हेही वाचा-Maharashtra Assembly Election Result 2024 : प्राथमिक कल येताच संजय राऊतांची रडारड सुरु)

देवेंद्र फडणवीसांनी (Devendra Fadnavis) तेराव्या फेरीअखेरीस आपल्या दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघातून तब्बल 20919 मतांनी आघाडी कायम ठेवली आहे. तर आज फडणवीस हे आपल्या नागपूर येथील निवासस्थानी जाणार असल्याची माहिती मिळत आहे.

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.