विधानसभा निवडणुकीचे निकाल (Maharashtra Assembly Election Result 2024) आज (२३ नोव्हें.) जाहीर होत आहे. राज्यात 4,136 उमेदवारांनी निवडणूक लढवली. राज्यातील 9 कोटी 70 लाख 25 हजार 119 मतदारांसाठी 1,00,427 मतदान केंद्रांवर मतदानाची व्यवस्था केली होती. मतदारांनी यंदा विक्रमी मतदान केले. त्यामुळे राज्यात महायुती (Mahayuti) आणि महाविकास आघाडी (MVA) यांच्यापैकी कोणाची सरशी होणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. (Maharashtra Assembly Election Result 2024)
#WATCH | BJP candidate from Colaba Assembly seat and Maharashtra Legislative Assembly Speaker, Rahul Narwekar says,”…According to me, Mahayuti will win 175 seats…” pic.twitter.com/6sBKxcTJ0s
— ANI (@ANI) November 23, 2024
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) , उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis), अजित पवार (Ajit Pawar), नाना पटोले, पृथ्वीराज चव्हाण, राधाकृष्ण विखे पाटील, बाळासाहेब थोरात, नसीम खान, आदित्य ठाकरे, अमित ठाकरे (Amit Thackeray) , नवाब मलिक आणि झिशान सिद्दीकी या नेत्यांचं भवितव्य ठरणार आहे. (Maharashtra Assembly Election Result 2024)
#WATCH | #MaharashtraElection2024 | Counting of postal ballots begins. Visuals from a counting centre under Colaba Assembly constituency in Mumbai. pic.twitter.com/f9wXDuoG7L
— ANI (@ANI) November 23, 2024
८ वाजता राज्यभरात मतमोजणीला सुरुवात झाली आहे. पोस्टल मतांचा कल हाती येत आहे. लोकसभेच्यावेळी निवडणुकांचे एक्झिट पोल (Exit polls) हे खोटे ठरले होते. मात्र, यावेळी काय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. सुरूवातीचे चित्र पाहता, एक्झिट पोलनुसार महायुती आघाडीवर असल्याचे दिसत आहे. त्यामुळे यावेळी एक्झिट पोल खरे ठरतील का? हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.(Maharashtra Assembly Election Result 2024)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community