- सचिन धानजी, मुंबई
विधानसभा निवडणुकीत उबाठा शिवसेनेचे मुंबईत नऊ आमदार निवडून आले असून यापैंकी आठ आमदार हे मनसे आणि मुस्लिमांमुळे हे सर्व आमदार निवडून आल्याचे दिसून येत आहे. माहीम, विक्रोळी, वरळी, जोगेश्वरी, वर्सोवा, वांद्रे पूर्व, कलिना, आणि दिंडोशी या आठ विधानसभा मतदारसंघांमध्ये उबाठा शिवसेनेचे उमेदवार अगदी काठावर निवडून आले आहेत. त्यामुळे उबाठा शिवसेनेला मुस्लिम मतदारांनी केलेले मतदान आणि मनसेचे उमेदवार यांच्यामुळे उबाठा शिवसेनेचे सात आमदार निवडून येण्यास मदत झाली आहे. त्यामुळे उबाठा शिवसेनेच्या मुंबईतील यशात मनसे आणि मुस्लिम मतांचा मोठा हातभार लागल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे मनसे आणि मुस्लिम या एमएम फॅक्टरनेच उबाठा शिवसेनेला तारल्याचे दिसून आले आहे.
मुंबईमध्ये उबाठा शिवसेनेने २२ उमेदवार उभे केले केले होते आणि उर्वरीत जागांमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे उमेदवार निवडणूक रिंगणात होते. या निवडणुकीत महाविकास आमदार निवडून आले असून यामध्ये उबाठा शिवसेनेचे ०९ आमदार हे निवडून आले आहेत. तर काँग्रेसचे तीन आमदार आणि समाजवादी पक्षाचे एक याप्रकारे महाविकास आघाडीचे एकूण १४ आमदार निवडून आले आहेत. मात्र, माहीम, वरळी, दिंडोशी, विक्रोळी, जोगेश्वरी पूर्व, वर्सोवा, वांद्रे पूर्व, कलिना या मतदारसंघांमध्ये मनसे उमेदवारांने मिळवलेल्या मतदानाच्या तुलनेत कमी मतांनी शिवसेना उमेदवारांचा पराभव झाला आहे. त्यामुळे मनसेचा जर उमेदवार निवडणूक रिंगणात नसते तर शिवसेनेचे उमेदवार निवडून आले असते आणि उबाठा शिवसेनेच्या उमेदवारांचा पराभव झाला असता. विशेष म्हणजे या वांद्रे पूर्व, माहीम, जोगेश्वरी, या मतदारसंघांमध्ये मुस्लिम मतांच्या जोरावर उबाठा शिवसेनेच्या उमेदवारांचा विजय सुकर झाल्याचे दिसून येत आहे.
याशिवाय भायखळा विधानसभा मतदारसंघांमध्ये उबाठा शिवसेनेच्या उमेदवारांना मुस्लिम मतदारांकडून झालेल्या मतदानामुळेच या जागांवर उबाठा शिवसेनेचे उमेदवार निवडून आल्याचे दिसून येत आहे.
(हेही वाचा – शिवसेना कार्यकारिणी बैठकीत मुख्य नेते Eknath Shinde यांना सर्वाधिकार)
या विधानसभा मतदारसंघांमध्ये मनसे उमेदवारांनी मिळवलेले यश आणि उबाठा शिवसेना उमेदवारांचे मताधिक्य
माहीम विधानसभा मतदारसंघ
महेश सावंत (उबाठा) शिवसेना : ४७३८१ (९४४ मताधिक्य) विजयी
सदा सरवणकर (शिवसेना) : ४६४३७
अमित राज ठाकरे (मनसे) : ३१,६११
वरळी विधानसभा मतदारसंघ
आदित्य ठाकरे (उबाठा) शिवसेना : ६३,३२१ (सुमारे ११ हजार मताधिक्य) विजयी
मिलिंद देवरा (शिवसेना) : ५४५२३
संदीप देशपांडे (मनसे) : १९,३६७
दिंडोशी विधानसभा मतदारसंघ
सुनील प्रभू (उबाठा शिवसेना) शिवसेना : ६६,१३८ (सुमारे चार हजार मताधिक्य) विजयी
संजय निरुपम (शिवसेना) : ६२,४८४
भास्कर परब (मनसे) : १८,०००
(हेही वाचा – Maharashtra Election Results 2024 : महाविकास आघाडीला मोठा झटका; ‘या’ दिग्गज नेत्यांचा झाला पराभव )
विक्रोळी विधानसभा मतदारसंघ
सुनील राऊत (उबाठा) शिवसेना : ६६,०९३ (सुमारे १५,५५५ मताधिक्य) विजयी
सुवर्णा करंज (शिवसेना) : ५०, ५६७
विश्वजित ढोलम (मनसे) : १६,८१३
जोगेश्वरी पूर्व विधानसभा मतदारसंघ
अनंत नर (उबाठा) शिवसेना : ७७,०४४ (सुमारे १५४१ मताधिक्य) विजयी
मनिषा वायकर (शिवसेना) : ७५,५०७
भालचंद्र आंबुरे (मनसे) : १२,८०५
वर्सोवा विधानसभा मतदारसंघ
हारुन खान (उबाठा) शिवसेना : ६५,३९६ (सुमारे १६०० मताधिक्य) विजयी
डॉ. भारती लव्हेकर (शिवसेना) : ६३,७९६
संदेश देसाई (मनसे) : ५,७५२
राजु श्रीपाद पेडणेकर, अपक्ष : ६,७५२
(हेही वाचा – आंबेडकरी जनतेच्या भीमशक्तीमुळेही महायुतीचा ऐतिहासिक महाविजय; Ramdas Athawale यांचे प्रतिपादन)
वांद्रे पूर्व विधानसभा मतदारसंघ
वरुण सरदेसाई (उबाठा) शिवसेना : ५७,७०८ (सुमारे ११ हजार मताधिक्य) विजयी
झिशान सिद्दीकी (राष्ट्रवादी काँग्रेस) : ४३,३४३
तृप्ती सावंत (मनसे) : १६,०७४
करण सरमळकर, अपक्ष ८,५२०
कलिना पूर्व विधानसभा मतदारसंघ
संजय पोतनीस (उबाठा) शिवसेना : ५९,८२० (सुमारे ५ हजार मताधिक्य) विजयी
अमरजितसिंह (भाजपा) : ५४,८१२
संदीप हुटगी (मनसे) : ६,०५२
हेही पहा –
Join Our WhatsApp Community