अमित शाह, मोदी आणि अदानी यांनी हा निकाल फिरवला आहे. निकालामागे खूप मोठे कारस्थान दिसते. निकाल लावून घेतलेला दिसतो. अजित पवार, एकनाथ शिंदे यांच्याविषयी राज्यात एवढा रोष असूनही त्यांच्या सगळ्या जागा कशा निवडून येतात ? हा जनतेचा कौल नाही, हा लावून घेतलेला निकाल आहे, अशी रडारड शिवसेना प्रवक्ते संजय राऊत यांनी केली आहे. विधानसभा निवडणुकांच्या मतदानानंतर मतमोजणी सुरु आहे. त्यामध्ये महायुतीला बहुमत आहे, असे प्राथमिक कलांमध्ये दिसून येत आहे. त्यामुळे अद्याप निकाल स्पष्ट झालेला नसतांनाच संजय राऊत (Sanjay Raut) यांनी रडारड सुरु केलेली आहे. (Maharashtra Assembly Election Result 2024)
(हेही वाचा – BMC : मालमत्ता कर न भरणाऱ्या मोठ्या थकबाकीदारांची यादी प्रसिद्ध; महानगरपालिकेकडून मालमत्ता जप्तीची नोटीस जारी)
माध्यमांशी बोलतांना संजय राऊत यांनी पुन्हा बिनबुडाचे आरोप करायला सुरुवात केली आहे. भारतीय जनता पक्ष ६५-७० जागा जिंकेल, असा आमचा ग्राऊंड रिपोर्ट आहे. शिंदेंना कोणत्याही परिस्थितीत २० च्या पुढे जागा मिळणार नाहीत, असे आमचा रिपोर्ट होता. हा जनतेचा कौल नाही. हा मराठी माणसं, जनतेचा कौल नाही, असे ते म्हणाले.
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी झालेल्या मतदानानंतर मतमोजणी सुरू आहे. सकाळी १० वाजेपर्यंतच्या आकडेवारीनुसार महायुती २०४ जागांवर आघाडीवर आहे, तर महाविकास आघाडी ४७ जागांवर आघाडीवर आहे. भाजपा १०९ जागांवर, शिवसेना ५६ जागांवर, तर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट ३४ जागांवर आघाडीवर आहे. महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस १९ जागांवर, उबाठा १९ जागांवर, तर शरद पवार गट ९ जागांवर आघाडीवर आहे. (Maharashtra Assembly Election Result 2024)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community