Maharashtra Assembly Election Result 2024: लाडक्या बहिणींच्या राज्यात विजयी महिला आमदार किती? वाचा सविस्तर…

41
Maharashtra Assembly Election Result 2024: लाडक्या बहिणींच्या राज्यात विजयी महिला आमदार किती? वाचा सविस्तर...
Maharashtra Assembly Election Result 2024: लाडक्या बहिणींच्या राज्यात विजयी महिला आमदार किती? वाचा सविस्तर...

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 (Maharashtra Assembly Election Result 2024) चा निकाल जाहीर झाला आहे. यंदाच्या विधानसभेत महायुती (Mahayuti) घवघवीत यश मिळवत सत्तेची चावी आपल्याकडे राखण्यात यशस्वी ठरली. २३२ जागांवर महायुतीचे उमेदवार विजयी झाले आहे. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत यंदा लाडकी बहीण योजना (Ladki Bahin Yojana) महायुतीच्या प्रचाराचा केंद्रबिंदू ठरली.

हेही वाचा-Maharashtra Assembly Election Result 2024: महायुतीच्या ‘या’ १५ उमेदवारांचे मताधिक्य लाखाच्यावर!

राज्याच्या विधानसभा निवडणुकांमध्ये रिंगणात असलेल्या २५० हून अधिक महिला उमेदवारांपैकी एकूण २१ महिला आमदार झाल्या आहेत. यात महायुती आणि महाविकास आघाडी अशा दोन्हींचा समावेश आहे. महायुती आणि महाविकास आघाडी अशा दोन्हीतून प्रत्येकी ३० महिला उमेदवार विधानसभेत होत्या. यात भाजपकडून ११ महिला आमदार झाल्या आहेत. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत भाजपने १३२ जागा जिंकल्या यातील ११ ठिकाणी महिला उमेदवार जिंकल्या आहेत.

विजयी महिला आमदारांची यादी
चिखली – श्वेता विद्याधर महाले
भोकर – श्रीजया अशोकराव चव्हाण
जिंतूर – बोर्डीकर मेघना दीपक साकोरे
वसई – स्नेहा पंडित
कल्याण पूर्व – सुलभा गणपत गायकवाड
बेलापूर – मंदा म्हात्रे
दहिसर – चौधरी मनिषा अशोक
पर्वती – माधुरी सतीश मिसाळ
शेगाव – मोनिका राजीव राजळे
केज – नमिता अक्षय मुंदडा
फुलंब्री – अनुराधा अतुल चव्हाण
मंजुळा गावित (साक्री)
संजना जाधव (कन्नड)
सुलभा खोडे (अमरावती),
सरोज अहिरे (देवळाली),
सना मलिक (अनुशक्तीनगर)
आदिती तटकरे (श्रीवर्धन)
ऋतुजा लटके (अंधेरी पूर्वमधून)
प्रवीणा मोरजकर (कुर्ला मतदारसंघातून)
ज्योती गायकवाड (धवारी मतदारसंघातून)

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.