विधानसभा निवडणुकीचे निकाल (Maharashtra Assembly Election Result 2024) आज (२३ नोव्हें.) जाहीर होत आहे. राज्यात 4,136 उमेदवारांनी निवडणूक लढवली. राज्यातील 9 कोटी 70 लाख 25 हजार 119 मतदारांसाठी 1,00,427 मतदान केंद्रांवर मतदानाची व्यवस्था केली होती. मतदारांनी यंदा विक्रमी मतदान केले. त्यामुळे राज्यात महायुती (Mahayuti) आणि महाविकास आघाडी (MVA) यांच्यापैकी कोणाची सरशी होणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. (Maharashtra Assembly Election Result 2024)
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक निकालांचे सुरुवातीचे कल हाती; महायुती आघाडीवर !
.
.#MaharashtraElection2024 #Maharashtra #MaharashtraElections #Mahayuti pic.twitter.com/162ECiHdoL— Hindusthan Post Marathi (@HindusthanPostM) November 23, 2024
पोस्टल मतमोजणीला सुरूवात झाली असून सुरुवातीचे कल हाती येत आहेत. बारामती (Baramati) मतदारसंघ हा प्रतिष्ठेचा मानला जातो. यंदाही बारामतीत पवार विरूद्ध पवार असा सामना रंगल्याचे पाहायला मिळाले. दरम्यान, बारामतीकरांनी दिलेल्या कौलनुसार आज बारामतीचा दादा कोण याचा फैसला होत आहे.
Counting started in the Baramati assembly constituency… #Maharashtra #MaharashtraElection2024 @IndiaToday @aajtak pic.twitter.com/OYrfbGbGwU
— Omkar Wable (@omkarasks) November 23, 2024
मतमोजणीच्या सुरूवातीला बारामती विधानसभा मतदारसंघात शरद पवार गट राष्ट्रवादीचे उमेदवार युगेंद्र पवार हे आघाडीवर होते. मात्र, आता त्यांची पिछेहाट झाली आहे. ईव्हीएम मतमोजणी सुरू होताच बारामतीत ट्विस्ट आला असून अजित पवार (Ajit Pawar) आघाडीवर असून युगेंद्र पवार (Yugendra Pawar) हे पिछाडीवर गेले आहेत.
हेही पहा-
Join Our WhatsApp Community