Maharashtra Assembly Election Result 2024: कोकणात राणे पुत्रांची स्थिती काय?

90
Maharashtra Assembly Election Result 2024: कोकणात राणे पुत्रांची स्थिती काय?
Maharashtra Assembly Election Result 2024: कोकणात राणे पुत्रांची स्थिती काय?

विधानसभा निवडणुकीचे निकाल (Maharashtra Assembly Election Result 2024) आज (२३ नोव्हें.) जाहीर होत आहे. राज्यात 4,136 उमेदवारांनी निवडणूक लढवली. राज्यातील 9 कोटी 70 लाख 25 हजार 119 मतदारांसाठी 1,00,427 मतदान केंद्रांवर मतदानाची व्यवस्था केली होती. मतदारांनी यंदा विक्रमी मतदान केले. त्यामुळे राज्यात महायुती (Mahayuti) आणि महाविकास आघाडी (MVA) यांच्यापैकी कोणाची सरशी होणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. (Maharashtra Assembly Election Result 2024)

(हेही वाचा-Maharashtra Assembly Election Result 2024 : प्राथमिक कल येताच संजय राऊतांची रडारड सुरु)

विधानसभा निवडणुकांचे सुरूवातीचे काही कल हाती येत आहेत. संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेल्या कुडाळ विधानसभा मतदारसंघातून खासदार नारायण राणे यांचे पुत्र निलेश राणे (Nilesh Rane) हे सुरूवातीस पिछाडीवर होते. मात्र, आता निलेश राणे यानी आघाडी घेतली आहे. ९२१ मतांच्या फरकाने निलेश राणे आघाडीवर आहेत. तर, वैभव नाईक (Vaibhav Naik) हे पिछाडीवर आहेत.

(हेही वाचा-Maharashtra Assembly Election Result 2024: काँग्रेसचा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा पिछाडीवर!)

कणकवली विधानसभा मतदारसंघातून नितेश राणे (Nitesh Rane) आघाडीवर असून शिवसेना ठाकरे गटाचे संदेश पारकर (Sandesh Parkar) हे पाछाडीवर आहेत. दोन्ही राणे बंधूंनी आघाडी घेतलेली आहे. या दोन्ही मतदारसंघात कोण विजयी होणार हे थोड्याच वेळात स्पष्ट होणार आहे.

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.