Maharashtra Assembly Election Result 2024 : कोणत्या पक्षाला किती मिळणार मंत्रीपदे ?; संख्याबळानुसार मंत्रीपदांचा आग्रह

51
Maharashtra Assembly Election Result 2024 : कोणत्या पक्षाला किती मिळणार मंत्रीपदे ?; संख्याबळानुसार मंत्रीपदांचा आग्रह
Maharashtra Assembly Election Result 2024 : कोणत्या पक्षाला किती मिळणार मंत्रीपदे ?; संख्याबळानुसार मंत्रीपदांचा आग्रह

महायुतीतील (Maha Yuti) एकाच पक्षाचे किंवा तीन पक्षांचे मिळून दिग्गज आमदार निवडून आले आहेत. त्यामुळे मंत्रीपदासाठी कशा प्रकारे निवड करायची, हा प्रश्न महायुतीच्या तिन्ही नेत्यांसमोर निर्माण झाला आहे. संख्याबळानुसार मंत्रीपदे तीन पक्षांमध्ये वाटली जावीत, यासाठी भाजपा आग्रही असेल, असे खात्रीलायक सूत्रांनी सांगितले. मुख्यमंत्र्यांसह मंत्र्यांची एकूण संख्या ४३ पेक्षा अधिक नसते. त्यामुळे मंत्रीमंडळात मुख्यमंत्र्यांव्यतिरिक्त एकूण ४२ मंत्री असतील. (Maharashtra Assembly Election Result 2024)

(हेही वाचा – लाडक्या बहि‍णींना 2100 रुपये कधीपासून मिळणार? CM Eknath Shinde म्हणाले…)

विद्यमान एकनाथ शिंदे (Eknath Shinde) सरकारमध्ये सर्व २९ मंत्री हे कॅबिनेट होते. त्यात भाजपला १०, शिवसेनेला १०, तर अजित पवार गटाकडे ९ मंत्रिपदे होती. या वेळीही तीन पक्ष सत्तेत असतील. समान मंत्रीपदे द्यायची तर प्रत्येकी साधारण १४ मंत्रिपदे येतील. शिंदे सरकारमध्ये जवळपास समसमान मंत्रीपदे तिन्ही पक्षांना देण्यात आली होती; पण या वेळी तो फॉर्म्युला नसेल; कारण भाजपच्या विजेत्यांची संख्या मोठी आहे.

शिंदे-फडणवीस सरकार २०२२ मध्ये झाले तेव्हा २० कॅबिनेट मंत्री होते. अजित पवार (Ajit Pawar) उपमुख्यमंत्री झाले व मंत्र्यांची संख्या २९ झाली होती. त्यानंतर अनेकदा मंत्रिमंडळ विस्तार होणार म्हणून बातम्या आल्या; पण तसे काही झाले नाही. कॅबिनेट मंत्री होते. पण यावेळी कॅबिनेट व राज्यमंत्री दोघेही असतील, असे मानले जाते.

आपल्याला आमदारांच्या संख्येनुसार मंत्रिपदे मिळावीत, यासाठी भाजप आग्रही असेल, असे म्हटले जाते. हा आग्रह मान्य झाला, तर भाजपला २५, शिवसेनेला १०, तर अजित पवार गटाला ८ मंत्रीपदे मिळतील. (Maharashtra Assembly Election Result 2024)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.