Maharashtra Assembly Election Result 2024: ‘या’ दिवशी होणार महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाचा शपथविधी ?

101
Maharashtra Assembly Election Result 2024: नव्या सरकारचा वानखेडे स्टेडियमवर शपथविधी!
Maharashtra Assembly Election Result 2024: नव्या सरकारचा वानखेडे स्टेडियमवर शपथविधी!

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे निकाल (Maharashtra Assembly Election Result 2024) आज (२३ नोव्हें.) जाहीर होत आहे. राज्यात 4,136 उमेदवारांनी निवडणूक लढवली. राज्यातील 9 कोटी 70 लाख 25 हजार 119 मतदारांसाठी 1,00,427 मतदान केंद्रांवर मतदानाची व्यवस्था केली होती. मतदारांनी यंदा विक्रमी मतदान केले. त्यामुळे राज्यात महायुती (Mahayuti) आणि महाविकास आघाडी (MVA) यांच्यापैकी कोणाची सरशी होणार, याकडे सर्वांच्या नजरा होत्या. (Maharashtra Assembly Election Result 2024) मात्र, आता चित्र स्पष्ट झालं आहे.

(हेही वाचा-Maharashtra Assembly Election Result 2024: देवेंद्र फडणवीसांचा विजयानंतर पुन्हा एकदा एक हैं तो ‘सेफ’ हैं! चा नारा!)

राज्यात पुन्हा एकदा महायुतीचे सरकार स्थापन होणार असल्याचे आता स्पष्ट झालं आहे. कारण, विधानसभा निवडणुकांच्या निकालात भाजप महायुतीने मोठी आघाडी घेतली आहे. तब्बल 200 पेक्षा जास्त जागांवर महायुतीला आघाडी असून अनेक उमेदवार विजयी देखील झाले आहेत. विशेष म्हणजे भाजपला 120 पेक्षा जास्त जागांवर आघाडी दिसत असून भाजपच राज्यातील सर्वात मोठा पक्ष ठरल्याचं दिसून येत आहे. (Maharashtra Assembly Election Result 2024)

(हेही वाचा-निकाल स्पष्ट होताच Eknath Shinde यांचे महत्वाचे विधान; मुख्यमंत्री पदाविषयी आमचं काही ठरलेच नव्हते)

महायुतीचा मुख्यमंत्रीपदाचा दावेदार कोण, असा प्रश्न यानिमित्ताने समोर आला आहे. त्यातच, महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाचा शपथविधी (oath ceremony) 25 तारखेला होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. राज्यातील विधानसभेचा कार्यकाळ 26 तारखेला संपत असल्यामुळे एक दिवस आधीच महायुती सरकार स्थापन करणार असल्याची माहिती मिळत आहे. (Maharashtra Assembly Election Result 2024)

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.