विधानसभा निवडणुकीचे निकाल (Maharashtra Assembly Election Result 2024) आज (२३ नोव्हें.) जाहीर होत आहे. राज्यात 4,136 उमेदवारांनी निवडणूक लढवली. राज्यातील 9 कोटी 70 लाख 25 हजार 119 मतदारांसाठी 1,00,427 मतदान केंद्रांवर मतदानाची व्यवस्था केली होती. मतदारांनी यंदा विक्रमी मतदान केले. त्यामुळे राज्यात महायुती (Mahayuti) आणि महाविकास आघाडी (MVA) यांच्यापैकी कोणाची सरशी होणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. (Maharashtra Assembly Election Result 2024) विधानसभा निवडणुकांचे सुरूवातीचे निकाल हाती येत आहेत.
(हेही वाचा-मुख्यमंत्री कोण होणार ? भाजपाच्या ‘या’ नेत्याचा मोठं विधान; म्हणाले… )
महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीच्या निकालात महायुतीला जोरदार यश मिळालं आहे. बारा वाजेपर्यंतच्या आकडेवारीनुसार भाजपला 126, शिवसेनाला 56, अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला 38 जागांवर आघाडी मिळाली आहे. काँग्रेसला 18, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे 19 आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्ष 14 जागांवर आघाडीवर आहे. यावरुन असे दिसत आहे की, महाविकास आघाडीतील कोणताही पक्ष 28 ची संख्या पार करण्याची शक्यता कमी असल्यानं विरोधी पक्षनेतेपद (Leader of Opposition) देखील राज्याच्या विधानसभेत नसणार अशी शक्यता आहे.(Maharashtra Assembly Election Result 2024)
नियम काय ?
महाराष्ट्राच्या विधानसभेची सदस्यसंख्या 288 आहे. बहुमतानं सरकार स्थापन करणाऱ्या पक्षाला किंवा आघाडीला 144 पेक्षा अधिक जागा आवश्यक आहेत. तर, विरोधी पक्षनेता पद मिळवण्यासाठी एखाद्या राजकीय पक्षाला विधानसभेच्या एकूण सदस्यसंख्येच्या म्हणजे 288 जागांच्या एक दशांश आमदार संख्या असणं आवश्यक आहे. 288 च्या एक दशांश म्हणजे 28 पेक्षा आमदार ज्या पक्षाकडे आमदार असतील त्यांचा विरोधी पक्षनेता होऊ शकतो. (Maharashtra Assembly Election Result 2024)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community