Maharashtra Assembly Election Result 2024 : महायुतीला शपथविधीची घाई नाही; राष्ट्रपती राजवट लागणार का ?

127
Maharashtra Assembly Election Result 2024 : महायुतीला शपथविधीची घाई नाही; राष्ट्रपती राजवट लागणार का ?
Maharashtra Assembly Election Result 2024 : महायुतीला शपथविधीची घाई नाही; राष्ट्रपती राजवट लागणार का ?

राज्यातील २८८ नवीन आमदार निर्वाचित झाल्यासंदर्भातील राजपत्र रविवार, २४ नोव्हेंबर रोजी प्रसिद्ध करण्यात आल्याने नवीन विधानसभा अस्तित्वात आली आहे. आता २६ नोव्हेंबरपूर्वी नवीन सरकार स्थापन करणे, हे वैधानिकदृष्ट्या अनिवार्य नसेल. नवीन सरकारच्या शपथविधीची तारीख अद्याप ठरलेली नाही. (Maharashtra Assembly Election Result 2024)

(हेही वाचा – विधानसभा निकालानंतर vidhan parishad ची लॉटरी कुणाला लागणार ? बावनकुळे, पडळकर, कराड, विटेकर निवडून आल्याने जागा रिक्त)

महाराष्ट्र विधानसभेचा निकाल लागल्यानंतर २५ नोव्हेंबर या दिवशी शपथविधी होईल, असे सांगितले जात होते. २५ तारखेला शपथविधी झाला नाही, तर राष्ट्रपती राजवट लागेल, असे सांगितले जात होते. प्रत्यक्षात मात्र २५ नोव्हेंबरला शपथविधी करण्याची महायुतीमध्ये कोणतीही घाई नाही. महायुतीमध्ये मुख्यमंत्रीपदाच्या फॉर्म्युलाविषयी चर्चा चालू आहे. असे असले, तरी राष्ट्रपती राजवट लागण्याची शक्यता नाही.

केंद्रीय निवडणूक आयोगाने सर्व २८८ आमदार निर्वाचित झाल्यासंदर्भातील राजपत्राचा मसुदा राज्यपालांकडे सादर केला. राज्यपालांच्या मान्यतेनंतर राजपत्र जारी करण्यात आले. ज्या दिवशी असे राजपत्र प्रसिद्ध केले जाते, त्या दिवसापासून नवीन विधानसभा अस्तित्वात आली, असे समजण्यात येते. ही प्रक्रिया २६ नोव्हेंबरपूर्वी पूर्ण करणे आवश्यक होते. कारण, चौदाव्या विधानसभेची मुदत २६ नोव्हेंबर, मंगळवारी संपणार आहे.

केव्हा होईल शपथविधी ?

सोमवार, २५ नोव्हेंबर रोजी नवीन मंत्रीमंडळाचा शपथविधी होणार नाही, हे स्पष्ट झाले आहे. २६ नोव्हेंबर संविधान दिनाचे निमित्त साधून शपथविधी केला जाईल, असे म्हटले जात होते. मात्र, महायुतीच्या पातळीवर सध्या त्या दृष्टीने अपेक्षित हालचाली होतांना दिसत नाहीत. २६ नोव्हेंबरला चौदाव्या विधानसभेची मुदत संपणार असल्याने त्या आधी नवीन सरकार आले नाही तर राज्यात राष्ट्रपती राजवट लागू केली जाईल, असा तर्क दिला जात होता, पण आता तसे काहीही होणार नाही, हे स्पष्ट झाले आहे. (Maharashtra Assembly Election Result 2024)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.