Maharashtra Assembly Election Result : निकालानंतरही Nana Patole यांचा एकांगी लढा कायम राहणार!

विधानसभा निवडणूक निकालानंतर जर महायुतीची सत्ता आली, तर विधानसभेत नाना पटोले विरोधी पक्षनेता होतील इतकी काँग्रेसच्या आमदारांची संख्या निश्चित असेल. जर मविआची सत्ता आली तर काँग्रेस मुख्यमंत्री पदाचा दावा करेल.

115
  • नित्यानंद भिसे

२०१९च्या विधानसभा निवडणुकीनंतर (Maharashtra Assembly Election Result) उद्धव ठाकरे यांच्यामुळे भाजपाने सर्वाधिक आमदार निवडून आणूनही भाजपाचे सरकार न येता शिवसेना दोन्ही काँग्रेससोबत गेल्याने महाविकास आघाडीचे सरकार आले. या निवडणुकीत काँग्रेस चौथ्या क्रमांकावर होता तरीही सत्तेत आला. त्यावेळी नाना पटोले (Nana Patole) यांना मंत्रिपदाची आशा होती पण त्यांना त्यांच्या मर्जीविरुद्ध विधानसभा अध्यक्ष बनवले. मविआच्या एक वर्षाच्या कालावधीनंतर पटोले यांनी ४ फेब्रुवारी २०२१ रोजी विधानसभा अध्यक्षपदाचा परस्पर राजीनामा दिला. त्यानंतर नाना पटोले २९ जून २०२२ रोजी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बनले. पण काँग्रेसने पुढील दीड वर्षे विधानसभा अध्यक्षपदासाठी उमेदवार दिला नाही. याची जबाबदारी पटोले यांचीच होती. विधानसभा अध्यक्षपद रिक्त राहिल्याने पुढे एकनाथ शिंदेंनी ४० आमदारांना फोडून केलेले बंड रोखण्यात मविआला पर्यायाने उद्धव ठाकरेंना यश आले नाही. कारण शिवसेना सोडून गेलेले आमदार यांची आमदारकी रद्द करण्याचा निर्णय विधानसभा अध्यक्षच अस्तित्वात नसल्यामुळे होऊ शकला नाही. त्यामुळे शिवसेना पक्ष एकनाथ शिंदे यांच्याकडे गेला. तर उद्धव ठाकरे यांना वेगळा पक्ष काढावा लागला. शिवसेनेतील हे बंड यशस्वी होण्याला नाना पटोले कारणीभूत आहेत, असे आरोपही झाले.

WhatsApp Image 2024 11 21 at 7.28.21 PM

काँग्रेस अध्यक्षपदाची वाटचाल

मविआ सरकार गेले महायुतीचे सरकार आले. त्यानंतरच्या अडीच वर्षांपासून पटोले (Nana Patole) काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आहेत. काँग्रेसमध्ये अध्यक्षपदावर असलेल्या नेत्याचा थेट हायकमांडशी संपर्क येतो, पर्यायाने पक्षाची सगळी सूत्रे त्याच्या हाती येतात. प्रदेशाध्यक्ष बनल्यानंतर नाना पटोले यांनी पक्षातील ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण (जे सध्या भाजपामध्ये आहेत.), बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज चव्हाण यांना निर्णयप्रक्रियेतून बाजूला करायला सुरुवात केली. या दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातही फूट पडली आणि अजित पवार गट आणि शरद पवार गट असे दोन गट पडले. परिणामी २०१९च्या विधानसभा निवडणुकीतील संख्याबळानुसार मविआमध्ये तिसऱ्या क्रमांकावर असलेला काँग्रेस लोकसभेनंतर पहिल्या क्रमांकाचा पक्ष बनला. (Maharashtra Assembly Election Result)

(हेही वाचा Maharashtra Election Exit Poll पहा एका क्लिकवर; महाराष्ट्रात कुणाची सत्ता येणार?)

लोकसभेत राज्यात पहिल्या क्रमांकाचा बनला पक्ष

त्यामुळे नाना पटोले (Nana Patole) यांचा आत्मविश्वास वाढला. यांनी काँग्रेसचा टेकुसारखा वापर करण्यासाठी नव्हे, तर सत्तेतील प्रमुख पक्ष बनवण्याच्या दृष्टीने व्यूहरचना आखायला सुरुवात केली. याचा प्रत्यय लोकसभा निवडणूक २०२४ मध्ये जागा वाटपात आला. मविआतील घटक पक्ष उबाठा आणि राष्ट्रवादी (श.प.) यांच्या दबावापुढे न झुकता सर्वाधिक जागा पदरी पाडून घेतल्या आणि निकालातही मविआ आणि महायुतीतील घटक पक्षांमध्ये सर्वाधिक जास्त खासदार काँग्रेसने निवडून आणले. नाना पटोले (Nana Patole) पक्षाचे अध्यक्ष असतानाच काँग्रेस मविआमध्ये राज्यात चौथ्या क्रमांकावरून पहिल्या क्रमांकावर पोहोचली, भाजपाने शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस दोन्ही पक्ष फोडले पण काँग्रेसमध्ये अशोक चव्हाण वगळता मोठे भगदाड पाडता आले नाही. लोकसभेत बऱ्यापैकी खासदार निवडून आणले. या उपलब्धीमुळे काँग्रेसच्या हायकमांडच्या नजरेत नाना पटोले यांचे वजन वाढले आहे. (Maharashtra Assembly Election Result)

विधानसभा निवडणुकीत मुख्यमंत्री पदाचा दावेदार

विधानसभा निवडणुकीतही (Maharashtra Assembly Election Result) जागा वाटपात नाना पटोले (Nana Patole) यांनी पुन्हा सर्वाधिक जागा काँग्रेसला मिळाव्यात म्हणून जोर लावला. त्यावेळी उबाठाने ज्या ज्या जागा मागितल्या, त्याला विरोध केला. हा विरोध इतका विकोपाला गेला की, मविआमध्ये फूट पडणार, अशी परिस्थिती निर्माण झाली. लोकसभा आणि नंतर विधानसभा निवडणुकीत नाना पटोले यांचीच छाप दिसली. काँग्रेस विधानसभा निवडणुकीत १०१ जागा लढवत आहे. जागा वाटपात नाना पटोले (Nana Patole) शंभराहून अधिक जागा मिळाव्यात आणि उबाठाला शंभरापेक्षा कमी जागा मिळाव्यात यावर अडून राहिले, त्यासाठी त्यांनी संजय राऊतांनाही गप्प केले. मातोश्रीला झुकवले.

काँग्रेसला जरी असा आक्रमक अध्यक्ष बऱ्याच काळानंतर मिळाला असला, तरी तो देवेंद्र फडणवीस यांचा खास मित्र आहे, या मैत्रीची जाहीर वाच्यता स्वतः नाना पटोले (Nana Patole) यांनी केली आहे. आम्ही एकमेकांचे पूर्वीपासूनच खास मित्र आहोत, आमचे विचार वेगळे असले तरी आमची मैत्री चांगली आहे, असे नाना पटोले म्हणाले आहेत. हे इथे नमूद करणे गरजेचे आहे. निकालानंतर जर महायुतीची सत्ता आली, तर विधानसभेत नाना पटोले विरोधी पक्षनेता होतील इतकी काँग्रेसच्या आमदारांची संख्या निश्चित असेल. जर मविआची सत्ता आली तर काँग्रेस मुख्यमंत्री पदाचा दावा करेल. त्यावेळी निश्चितच नाना पटोले (Nana Patole) मुख्यमंत्री पदाचे प्रमुख दावेदार असतील. मात्र त्यासाठी त्यांना बाळासाहेब थोरात यांना मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीतून बाद करावे लागेल. यासाठी त्यांना हायकमांडकडून कसा प्रतिसाद मिळेल यावर सगळे अवलंबून असेल. दुसरीकडे शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्याकडूनही नाना पटोलेंच्या नावाला सहमती मिळण्याची शक्यता नाही. (Maharashtra Assembly Election Result)

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.