Maharashtra Assembly Interim Budget 2024 : ईस्टर्न फ्रीवेचा ठाण्यापर्यंत विस्तार करणार, तर ११ गड-किल्ल्यांना जागतिक दर्जाचे बनवण्याची योजना

Maharashtra Assembly Interim Budget 2024 : कृषि आणि पर्यटन क्षेत्रासाठी भरीव योजना असलेला महाराष्ट्राचा अर्थसंकल्प अर्थमंत्री अजितदादा पवार यांनी विधानसभेत मांडला

204
Maharashtra Assembly Interim Budget 2024 : ईस्टर्न फ्रीवेचा ठाण्यापर्यंत विस्तार करणार, तर ११ गड-किल्ल्यांना जागतिक दर्जाचे बनवण्याची योजना
Maharashtra Assembly Interim Budget 2024 : ईस्टर्न फ्रीवेचा ठाण्यापर्यंत विस्तार करणार, तर ११ गड-किल्ल्यांना जागतिक दर्जाचे बनवण्याची योजना

ऋजुता लुकतुके

१ फेब्रुवारी रोजी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी केंद्राचा अर्थसंकल्प सादर केला त्याप्रमाणे राज्याचा अर्थसंकल्पही यावेळी पूर्ण मुदतीचा नसून लेखानुदान आहे. पण, त्यामानाने राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी केलेल्या घोषणा सविस्तर आणि भरीव आहेत. सोमवारीच अजित पवार (Ajit Pawar) यांनी विधानसभेत ८,६०९ कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या सादर केल्या होत्या. यात अर्थखात्यासाठी १,८६१ कोटी रुपये तर महसूल विभागासाठी १,७९८ कोटी रुपयांची आहे. त्यानंतर सर्वाधिक तरतूद आहे ती ऊर्जा विभागासाठी १,३२१ कोटी रुपये इतकी.

(हेही वाचा – Gautam Adani: आशियातील सर्वात मोठ्या शस्त्रनिर्मिती कारखान्याचे उद्घाटन)

याशिवाय कृषि आणि पर्यटन क्षेत्रासाठीही अजित पवार यांनी काही ठोस कार्यक्रमांची घोषणा केली. अर्थमंत्र्यांनी मांडलेल्या अंतरिम अर्थसंकल्पातील तरतुदी पाहूया,

२०२४-२५ आर्थिक वर्षासाठी राज्यात महसूली जमा ४,९८,७५८ कोटी रुपये, तर महसूली खर्च ५,०८,४९२ कोटी रुपये. त्यामुळे महसूली तूट ९,७३४ कोटी रुपये इतकी आहे.

  • पुणे जिल्ह्यात जुन्नर इथं शिवसंग्रहालय उभारण्याची घोषणा
  • राज्यात ६ वंदे भारत रेल्वे गाड्या सुरू झाल्याची सभागृहाला माहिती
  • केंद्राकडून जीएसटीचा ८,६१६ कोटी रुपये इतका वाटा मिळाल्याची माहिती
  • पायाभूत सुविधा उभारणीत ईस्टर्न फ्रीवेचा ठाण्यापर्यंत विस्तार तसंच ११ गड-किल्ल्यांना जागतिक दर्जाचं बनवण्याची योजना
  • तुळजापूर, सोलापूर ते धाराशिव या रेल्वे मार्गासाठी भूसंपादनाला सुरुवात झाल्याची माहिती
  • रत्नागिरीतील मिरकरवाडा बंदराचं आधुनिकीकरण करण्याची योजना
  • राज्यभरात ७,५०० किमी रस्ते उभारणीची कामं हाती घेणार

  • नवी मुंबई (Navi Mumbai) विमानतळाचा पहिला टप्पा मार्च २०२५ मध्ये कार्यान्वित होणार
  • वस्त्रोद्योग धोरणाअंतर्गत रेशनकार्डावर प्रत्येक घरी एक साडी देण्याची योजना सुरू
  • छत्रपती संभाजीनगर विमानतळासाठी निधीची तरतूद
  • निर्यात वाढीसाठी ५ औद्योगिक पार्क उभारणार, मिहान प्रकल्पासाठी १०० कोटींची तरतूद
  • महाराष्ट्राची अर्थव्यवस्था १ ट्रिलियन डॉलर करण्याचं काम सुरू, ८ लाख सौरऊर्जा प्रकल्प उभारणार
  • पुढील आर्थिक वर्षात ७,००० मेगावॅट वीजनिर्मितीचं उद्दिष्टं
  • राज्यातील रेल्वे मार्गांसाठी १५,५५४ कोटी रुपयांची तरतूद
  • शेतकऱ्यांसाठी सौरऊर्जा पंपांची योजना आणणार
  • संजय गांधी निराधार योजनेतील निवृत्तीवेतनात ५०० रुपयांनी वाढ, नवीन वेतनाची रक्कम १,५०० रु
  • कोल्हापूर, सांगलीत पूर रोखणारी यंत्रणा बसवण्यासाठी २,३०० कोटींची तरतूद
  • कोकण विभागात पर्यटनाच्या विकासासाठी ३३ गड-किल्ल्यांचं संवर्धन, अयोध्या आणि श्रीनगर इथं महाराष्ट्र भवन उभारणार
  • वाशिम, जालना, हिंगोली, अमरावती, भंडारा, वर्धा, बुलडाणा, अंबरनाथ, पालघर आणि नाशिक इथं १०० खाटांचं वैद्यकीय कॉलेज उभारणार
  • महाराष्ट्रातील पदकविजेत्या खेळाडूंच्या बक्षिसाच्या रकमेत १० पटींनी वाढ, सुवर्ण विजेत्याला १ कोटी, रौप्य विजेत्याला ७५ लाख आणि कांस्य विजेत्याला ५० लाख रुपये

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.