Monsoon Session: सभापतीपदाची निवडणुक कधी घेणार? विरोधी पक्षाचे आमदार आक्रमक

171
Monsoon Session: सभापतीपदाची निवडणुक कधी घेणार? विरोधी पक्षाचे आमदार आक्रमक
Monsoon Session: सभापतीपदाची निवडणुक कधी घेणार? विरोधी पक्षाचे आमदार आक्रमक

महाराष्ट्राच्या विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन (Maharashtra Assembly Monsoon Session) सुरु आहे. यावेळी शेकापचे जयंत पाटील, (Jayant Patil) काँग्रेसचे भाई जगताप, (Bhai Jagtap) अभिजित वंजारी, शरदचंद्र पवार गटाचे शशिकांत शिंदे आणि विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी विधानपरिषदेच्या सभापतीपदाची निवडणूक (Vidhan Parishad Speaker Election) कधी लावणार हा मुद्दा उपस्थित केला. यावर उपसभापती नीलम गोऱ्हे (Neelam Gorhe) यांनी सोमवारी गटनेत्यांच्या बैठकीत हे विषय मांडू असं म्हटलं. (Monsoon Session)

(हेही वाचा –Chief Minister face : मुख्यमंत्री पदासाठी Uddhav Thackeray यांच्या चेहऱ्याला शरद पवारांची नापसंती?)

शेकापचे नेते जयंत पाटील यांनी विधानपरिषदेच्या सभापती पदाचा मुद्दा उपस्थित केला. सभागृह संविधानाप्रमाणं चाललं पाहिजे. सभापतीची निवडणूक लावण्याबाबत ठराव मांडणार आहे, यावर आपल्याला चर्चा करावी लागेल, असं जयंत पाटील म्हणाले. गेली अनेक वर्षे सभापतीपद रिक्त आहे. एका मर्यादेपर्यंत तुम्ही उपसभापती असूनही सभापतीपदाचा चार्ज ठेवू शकता, असं जयंत पाटील म्हणाले. (Monsoon Session)

(हेही वाचा –विधान परिषदेसाठी भाजपाच्या १० नेत्यांच्या नावांची यादी व्हायरल, Chandrasekhar Bawankule यांचं स्पष्टिकरण)

भाई जगताप यांनी सभापती पदाचा विषय हा महत्त्वाचा आहे. हे पद इतकी वर्ष रिकामं असताना आपल्या सचिवालयानं राज्यपालांना कळवलं का याचं उत्तर तात्काळ हवं. आपल्या कर्तव्याबद्दल याच्याबद्दल आमच्या मनात शंका नाही. परंतु, अडीच वर्ष जे काम झालं ते अवैध आहे का? असा सवाल भाई जगताप यांनी केला. मुख्यमंत्र्यांनी या सभागृहात निवडणूक लावणार असल्याचं सांगितलं होतं, काय झालं? असा सवाल भाई जगताप यांनी केला. कामकाज संपण्यापूर्वी निवडणूक कधी घेणार याची माहिती द्या, असं भाई जगताप यांनी म्हटलं. (Monsoon Session)

(हेही वाचा –Ladakh Tank Accident : भारतीय सैन्याच्या रणगाड्यांना नदीत मोठा अपघात, ५ जवान हुतात्मा)

शशिकांत शिंदे यांनी मुख्यमंत्र्यांनी निवडणूक जाहीर करतो असं सांगितलं होतं त्याला सहा सात महिने झाले आहेत. किती दिवस हे पद रिक्त ठेवणार असं शशिकांत शिंदे म्हणाले. काँग्रेस आमदार अभिजित वंजारी यांनी देखील सभापती निवडणुकीबाबत प्रश्न उपस्थित केलं. विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी विधान परिषदेचा सभापती एकमताने निवडायला आम्ही तयार आहोत, असं म्हटलं. बहुमताचा विषय नाही पण सगळ्यांची भावना आहे. सभापतीची पण निवडणूक लवकरात लवकर व्हावी ही विनंती आहे, असं अंबादास दानवे म्हणाले. यावर सोमवारी गटनेत्यांच्या बैठकीत हा विषय काढू असं नीलम गोऱ्हे म्हणाल्या. (Monsoon Session)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.