Maharashtra Assembly Poll : भाजपाच्या यादीवर देवेंद्र फडणवीस यांचा वरचष्मा!

70
Maharashtra Assembly Poll : भाजपाच्या यादीवर देवेंद्र फडणवीस यांचा वरचष्मा!
  • खास प्रतिनिधी 

भाजपाकडून रविवारी २० ऑक्टोबर २०२४ रोजी विधानसभा ९९ उमेदवारांची पहिली यादी प्रसिद्ध झाली त्यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा वरचष्मा असल्याचे दिसून आले. त्यामुळे राज्यातील भाजपाचा चेहेरा हा देवेंद्र फडणवीस असल्याचे अधोरेखित झाले आहे. (Maharashtra Assembly Poll)

फडणवीस यांच्यावर विश्वास

राजस्थान, मध्य प्रदेश आणि गुजरात या राज्यांमध्ये विद्यमान आमदारांना घरी बसवून अनेक नव्या चेहेऱ्यांना भाजपाने संधी दिली होती. हेच धक्कातंत्र महाराष्ट्रातही भाजपाकडून राबवले जाईल आणि १०५ पैकी बहुतांश आमदारांना नाकारत नव्या चेहेऱ्यांना निवडणूक रिंगणात उतरवले जाईल, अशी जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात होत होती. मात्र पहिल्याच ९९ उमेदवारांच्या यादीत ७९ विद्यमान आमदार असल्याने फडणवीस यांच्या पसंतीच्या नावांना केंद्रीय नेतृत्वाने प्राधान्य देत विश्वास दाखवल्याचे स्पष्ट झाले आहे. (Maharashtra Assembly Poll)

(हेही वाचा – Congress चा मुख्यमंत्री होऊ नये, यासाठी Shiv Sena UBT कडून जागावाटपाचा वाद?)

सर्व मंत्र्यांना तिकीट

तसेच राज्यातील महायुती सरकारमध्ये २९ पैकी १० मंत्री भाजपाचे असून त्यातील ३-४ मंत्र्यांचे तिकीट कापले जाईल, असेही बोलले जात होते. तर देवेंद्र फडणवीस यांना दिल्लीच्या राजकारणात नेण्याचा केंद्रीय नेतृत्वाचा विचार असल्याची चर्चा होती. मात्र, तसे काही न होता सर्व १० मंत्र्याना उमेदवारी देण्यात आली असून फडणवीस यांचीही उमेदवारी जाहीर झाली आणि काही वादग्रस्त जागा वगळता उर्वरित यादीही लवकरच प्रसिद्ध केली जाईल, असे सांगण्यात आले. (Maharashtra Assembly Poll)

राजकीय पक्षांची भाऊगर्दी

यामुळे राज्यात महायुतीचे सरकार आल्यास भाजपाकडून मुख्यमंत्री पदाचा चेहेरा जाहीर करण्यात आला नसला तरी देवेंद्र फडणवीस हाच भाजपाचा चेहेरा असेल, असे संकेत या यादीवरून दिसून येत आहेत. राज्यात महायुतीच्या विरोधात वातावरण असून लहानसहान आघाड्या आणि राजकीय पक्षांच्या भाऊगर्दीत भाजपाला अपेक्षित यश मिळाले तर ‘देवाभाऊ’ यांच्या राजकीय कारकिर्दीला नवी भरारी मिळेल, अशी चर्चा प्रदेश भाजपाच्या गोटात होत आहे. (Maharashtra Assembly Poll)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.