भाजपाच्या पहिल्या उमेदवार यादीत मुंबईत आशीष शेलार आणि विनोद शेलार या सख्ख्या भावांना स्थान देण्यात आले. यावरून टीका होत असतानाच शिवसेनेच्या पहिल्या यादीतही दोन सख्ख्या भावांना उमेदवारी देण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे. (Maharashtra Assembly Poll)
मुंबई भाजपा अध्यक्ष आशीष शेलार यांना भाजपाने वांद्रे पश्चिम विधानसभा मतदार संघातून उमेदवारी दिली तर मालाड विधानसभा मतदार संघातून आशीष यांचे सख्खे मोठे बंधू विनोद यांना यांना उमेदवारी देण्यात आली आहे. (Maharashtra Assembly Poll)
(हेही वाचा- Eknath Shinde : शिवसेनेची पहिली यादी जाहीर; ४५ उमेदवारांचा समावेश)
वायकर यांची पत्नी निवडणूक रिंगणात
आज मंगळवारी २२ ऑक्टोबर २०२४ रोजी रात्री उशिरा शिवसेनेची (शिंदे) पहिली यादी प्रसिद्ध करण्यात आली. यात एकनाथ शिंदे यांच्यासोबत बंडात सहभागी झालेल्या बहुतांश विद्यमान आमदारांना पुन्हा संधी देण्यात आली आहे. तसेच लोकसभा निवडणुकीत शिवसेनेच्या तिकिटावर निवडून लोकसभेत पोहोचलेले खासदार रविद्र वायकर यांच्या पत्नी मनीषा रवींद्र वायकर यांना जोगेश्वरी पूर्व मतदार संघातून उमेदवारी देण्यात आली आहे. (Maharashtra Assembly Poll)
नाराज पिता, उमेदवार पुत्र
लोकसभा निवडणुकीत उमेदवारीसाठी इच्छुक असलेले आनंदराव अडसूळ यांचे चिरंजीव अभिजीत यांना अनुसूचित जातीसाठी राखीव असलेल्या दर्यापूर मतदार संघातून आणि शिवसेना नेते रामदास कदम यांचे पुत्र योगेश यांना दापोली मतदार संघातून उमेदवारी देण्यात आली आहे. तसेच खानापूर मतदार संघाचे दिवंगत आमदार अनिल बाबर यांचे पुत्र सुहास यांना खानापूर मतदार संघातून निवडणूक संधी देण्यात आली आहे. (Maharashtra Assembly Poll)
(हेही वाचा- Maharashtra Assembly Election 2024 : पहिल्याच दिवशी राज्यातून ५७ उमेदवारांचे ५८ अर्ज दाखल )
कोकणात सामंत बंधू
दरम्यान, दोन सख्ख्या भावांनादेखील शिंदे यांनी उमेदवारी दिली आहे. यामुळे विरोधकांना शिंदे यांच्यावरही घराणेशाहीचा आरोप करण्यास आयती संधी मिळाली आहे. कोकणातील रत्नागिरीचे आमदार आणि विद्यमान मंत्री उदय सामंत यांना पुन्हा एकदा रत्नागिरीतून उमेदवारी देण्यात आली आहे तर त्याचे सख्खे मोठे बंधू किरण सामंत यांना राजापूर मतदार संघातून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. (Maharashtra Assembly Poll)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community