Maharashtra Assembly Poll : निवडणुकीआधीच महायुती एक जागा हरली!

264
Maharashtra Assembly Poll : निवडणुकीआधीच महायुती एक जागा हरली!
  • सुजित महामुलकर

लोकसभा निवडणुकीनंतर ‘वोट जिहाद’ची चर्चा सुरू झाली ती मालेगाव मध्य (Malegaon central) या मुस्लिमबहुल विधानसभा मतदारसंघात झालेल्या एकगठ्ठा मतदानानंतर. या मतदारसंघात भाजपा उमेदवाराला केवळ साडेचार हजार मते मिळाली तर काँग्रेसच्या बाहेरून लादलेल्या उमेदवाराला १.९४ लाख मते पडली आणि मुस्लिम मतांचे गणित उघड झाले. (Maharashtra Assembly Poll)

पाच विधानसभा क्षेत्रात भाजपाची आघाडी

धुळे मतदारसंघात काँग्रेसच्या माजी आमदार शोभा बच्छाव यांना धुळे लोकसभा मतदारसंघात कोणताही जनसंपर्क नसताना तिकीट दिले गेले. त्या बाहेरच्या उमेदवार असल्याने धुळ्यातील सहा विधानसभा मतदारसंघांपैकी पाच मतदारसंघात भामरे यांच्यापेक्षा कमी मतदान झाले. सटाणा विधानसभा क्षेत्रात भामरे २१,९१३ मतांनी आघाडीवर होते, धुळे शहरात ४,८३२, मालेगाव बाह्यमध्ये ५५,२४२ धुळे ग्रामीणमध्ये ६३,७९८ आणि शिंदखेडामध्ये ४३,४२५ अशी मतांची आघाडी भामरे यांनी घेतली होती. असे असताना केवळ मालेगाव मध्य (Malegaon central) या मतदारसंघात बच्छाव यांनी १,९४,३२७ मतांची आघाडी घेत भामरे यांच्यावर ३,८३१ मतांनी विजय मिळवला. या मतदारसंघात भामरे यांना फक्त ४,५४२ मते मिळाली. (Maharashtra Assembly Poll)

(हेही वाचा – Amit Thackeray यांना अडचणीत आणण्याचा उबाठाचा डाव; निवडणूक आयोगाला दिले पत्र)

सगळे उमेदवार मुस्लिमच

मालेगाव मध्य (Malegaon central) विधानसभा मतदारसंघ ‘वोट जिहाद’मुळे प्रसिद्ध झाला. आता या विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघातून निवडणूक रिंगणात सर्वच्या सर्व उमेदवार हे मुस्लिम समाजाचे असून एकही नॉन-मुस्लिम नसल्याचे उमेदवार छाननीनंतर स्पष्ट झाले आहे. बहुदा हा राज्यातील एकमेव मतदारसंघ असेल ज्या जागेवर मुस्लिम समजाव्यतिरिक्त एकही उमेदवार निवडणूक रिंगणात नाही. (Maharashtra Assembly Poll)

निवडणुकीआधीच एक जागा कमी

महायुतीकडून भाजपाच्या सुरेखा पाटील यांनी उमेदवारी अर्ज (Malegaon central) दाखल केला होता, मात्र तो बाद झाला. पाटील यांच्याशिवाय महायुतीकडून अन्य एकही ‘डमी’ अर्ज या मतदार संघात (Malegaon central) भरण्यात आला नसल्याने निवडणुकीआधीच महायुतीची एक जागा कमी झाली, असे म्हणता येईल. (Maharashtra Assembly Poll)

(हेही वाचा – Shivaji Park Deepotsav : शिवाजी पार्कमधील दीपोत्सवावर उबाठा गटाचा आक्षेप)

केवळ महाविकास आघाडीच

त्यामुळे मालेगाव मध्य (Malegaon central) विधानसभा मतदारसंघात आता केवळ महाविकास आघाडीचे उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. काँग्रेसकडून एजाज बेग हे उमेदवार असून समाजवादी पक्षाच्या शानेहिंद निहाल अहमद आणि विद्यमान आमदार ‘एमआयएम’चे मुफ्ती मोहम्मद इस्माईल अब्दुल खलीक यांच्यात प्रमुख लढत होईल.

विशेष म्हणजे या विधानसभा मतदारसंघात (Malegaon central) १९७८ पासून (विधानसभा अस्तित्वात आल्यापासून) मुस्लिम समाजाव्यतिरिक्त आमदार एकदाही निवडून आला नाही. सध्या ‘एमआयएम’चे मोहम्मद खलीक हे या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व विधानसभेत करत आहेत. (Maharashtra Assembly Poll)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.