Maharashtra Assembly Poll : महायुतीत भावांच्या तीन जोड्या; ‘मविआ’मध्ये मात्र ‘लाडक्या बहिणी’ला विरोध!

55
Maharashtra Assembly Poll : महायुतीत भावांच्या तीन जोड्या; ‘मविआ’मध्ये मात्र ‘लाडक्या बहिणी’ला विरोध!
  • खास प्रतिनिधी 

महायुतीतील भाजपा आणि शिवसेना (शिंदे) या राजकीय पक्षांनी तीन सख्ख्या भावांना विधानसभा निवडणुकीत उमेदवाऱ्या दिल्या तर दुसरीकडे महाविकास आघाडीत एका ‘लाडक्या बहिणी’ला मात्र पक्षांतर्गत विरोधाला सामोरे जावे लागत आहे. या बहिणीला पक्षातूनच विरोध होत असल्याने तिच्या उमेदवारीबाबत साशंकता निर्माण झाली आहे. (Maharashtra Assembly Poll)

सख्खे भाऊ

महायुतीतील भाजपा या मोठ्या पक्षाने मुंबई भाजपा अध्यक्ष आशिष शेलार यांना वांद्रे पश्चिम मतदार संघातून उमेदवारी दिली आहे तर त्यांचे बंधू विनोद शेलार यांना मालाडमधून उमेदवारी दिली आहे. शिवसेना (शिंदे) पक्षानेही कोकणातील रत्नागिरीचे आमदार आणि विद्यमान मंत्री उदय सामंत यांना पुन्हा एकदा रत्नागिरीतून उमेदवारी दिली आहे तर त्याचे सख्खे मोठे बंधू किरण सामंत यांना राजापूर मतदारसंघातून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. याशिवाय भाजपा आणि शिवसेनेने एक-एक उमेदवार आणखी दिला आहे. निलेश राणे यांना कणकवलीमधून भाजपाने तिकीट दिले तर त्यांचे भाऊ निलेश यांनी बुधवारी २३ ऑक्टोबर २०२४ ला शिवसेनेत प्रवेश केला आणि कुडाळ मतदारसंघातून तात्काळ उमेदवारीही जाहीर झाली. (Maharashtra Assembly Poll)

(हेही वाचा – Prabhu Shree Ram यांच्याबद्दल आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्या अल्पवयीन मुस्लिम मुलाला अटक)

काँग्रेसच्या बहिणीला विरोध

महायुतीतील मुंबई भाजपा अध्यक्ष आशिष शेलार यांच्या भावाला उमेदवारी दिल्यानंतरही फारसा विरोध झाला नाही, मात्र, महाविकास आघाडीतील मुंबई काँग्रेस अध्यक्ष वर्षा गायकवाड यांनी आपल्या बहिणीला (ज्योति) धारावी मतदारसंघातून उमेदवारी देण्याची मागणी केली तर पक्षांतर्गत विरोध होत आहे. काँग्रेसचे उमेदवार निवड समितीचे सदस्य अशोक जगताप आणि धारावीतील काही पदाधिकाऱ्यांनी ज्योति गायकवाड यांच्या उमेदवारीला विरोध केला आहे. (Maharashtra Assembly Poll)

नोकरी सांभाळून समाजमाध्यमावर ‘सामाजिक कार्य’

आमदार वर्षा गायकवाड यांना उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढण्याची संधी मिळाली आणि अनपेक्षितपणे त्या निवडून आल्या. निवडणूक निकाल लागल्यानंतर त्यांच्या भगिनी ज्योति यांनी हॉस्पिटलमधील नोकरी सांभाळून समाजमाध्यमावर ‘सामाजिक कार्य’ची सुरुवात करत धारावी विधानसभा मतदारसंघात सक्रिय झाल्या. आता त्यांना आमदारकीचे वेध लागले आहेत. पण पक्षाने ‘हात’ दिला तरी पुढे मतदार किती ‘साथ’ देतील यावर त्यांचे भवितव्य अवलंबून असेल. (Maharashtra Assembly Poll)

(हेही वाचा – आम्हाला शांतता हवी; इंडोनेशियात Rohingya Muslims ना विरोध)

बहीण-भावात फरक

ज्योति गायकवाड आणि विनोद शेलार, हे दोघे मुंबई अध्यक्ष यांचे बहीण आणि भाऊ असले तरी ज्योति यांनी लोकसभा निवडणूक मे २०२४ निकालानंतर राजकारणात चंचु प्रवेश केला तर विनोद हे गेली तीन दशके राजकारणात सक्रिय असून यापूर्वी ते नगरसेवक म्हणून निवडून आले आहेत आणि कामही केले आहे. (Maharashtra Assembly Poll)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.