- सुजित महामुलकर
उमेदवारी भरण्याचा शेवटचा दिवस आला तरी महाविकास आघाडीतील जागावाटप निश्चित होत नसल्याने अखेर भायखळा मतदारसंघात काँग्रेस विरुद्ध शिवसेना उबाठा उमेदवार निवडणूक रिंगणात दिसतील, अशी चिन्हे आहेत. (Maharashtra Assembly Poll)
उबाठा-काँग्रेस दोघांचे अर्ज
‘मविआ’मधील शिवसेना उबाठाने भायखळा मतदारसंघात माजी नगरसेवक मनोज जामसुतकर यांची उमेदवारी जाहीर झाली आणि त्यांनी उमेदवारी अर्जही दाखल केला. मात्र, याबाबत मविआमध्ये एकमत झाले नसले तरीही सोमवारी २८ ऑक्टोबर २०२४ ला काँग्रेसचे माजी आमदार मधू चव्हाण यांनीही काँग्रेस पक्षातर्फे उमेदवारी अर्ज दाखल केला. (Maharashtra Assembly Poll)
(हेही वाचा – BJP तिसरी यादी जाहीर; वर्सोवातून भारती लव्हेकर, बोरिवलीतून संजय उपाध्याय यांना उमेदवारी)
उबाठात वाद
वास्तविक भायखळा विधानसभा मतदारसंघातून कोणाला उमेदवारी द्यावी यावरून शिवसेना उबाठा पक्षातही अंतर्गत वाद होता. शिवसेना उबाठा आमदार आणि उद्धव ठाकरे यांचे निकटवर्तिय मिलिंद नार्वेकर हे भायखळामधून अखिल भारतीय सेनेच्या गीता गवळी यांच्यासाठी प्रयत्नशील होते तर अन्य नेते जामसुतकर यांच्यासाठी सकारात्मक होते. अखेर उद्धव ठाकरे यांनी जामसूतकर यांची उमेदवारी घोषित केली. (Maharashtra Assembly Poll)
महायुतीला लाभ
महायुतीकडून विद्यमान आमदार यामिनी जाधव यांनी शिवसेना (शिंदे) पक्षाकडून उमेदवारी अर्ज भरला आहे. शिवसेना उबाठा आणि काँग्रेस उमेदवारीमुळे जाधव यांना मविआच्या मतविभागणीचा लाभ होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. (Maharashtra Assembly Poll)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community