- खास प्रतिनिधी
मुंबईतील माहीम विधानसभा मतदारसंघाची चर्चा अख्ख्या महाराष्ट्रात होत आहे. याला कारण आहे विद्यमान शिवसेना (शिंदे) आमदार आणि या मतदारसंघातील उमेदवार सदा सरवणकर यांनी अमित राज ठाकरे यांच्यासाठी निवडणुकीतून माघार घेण्यास नकार दिला आहे. यावरून सरवणकर यांनी समाजमाध्यमावर एक पोस्ट शेअर करत राज ठाकरे यांना सल्ला देण्याचा प्रयत्न करून पायावर धोंडा मारून घेतला. नेटकऱ्यांनी सरवणकर यांनाच ‘वय झाले आता घरी बसून आराम करा’ असा सल्ला दिला तर काहींनी ‘१५ वर्षे आमदारकी मिळवल्यानंतर एका कर्तुत्ववान युवकासाठी सीट सोडा, किती ती हाव’ असेही सुनावले. (Maharashtra Assembly Poll)
मनसे प्रमुख राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे पहिल्यांदाच निवडणूक लढवत असून माहीम मतदारसंघातून त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. तर शिवसेनेकडून (शिंदे) विद्यमान आमदार सदा सरवणकर आणि शिवसेना उबाठाकडून महेश सावंत निवडणूक रिंगणात आहेत. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत सोमवार ४ नोव्हेंबर २०२४ आहे. (Maharashtra Assembly Poll)
(हेही वाचा – RBI Gold Recovery : रिझर्व्ह बँकेनं लंडन बँकेत ठेवलेलं १०२ टन सोनं आणलं भारतात )
सरवणकर काय म्हणाले?
सरवणकर यांनी ‘X’वर एक पोस्ट केली त्यात त्यांनी म्हटले की, “मी चाळीस वर्षापासून शिवसेनेचा कार्यकर्ता आहे. आम्ही आमच्या कष्टाने आणि घामाने तीन वेळा माहिमचा आमदार झालो. बाळासाहेब असते तर त्यांनी मला आपल्या नातेवाईकांसाठी सीट सोडायला सांगितलं नसतं. त्यांचे पन्नास नातेवाईक दादर – माहिम मध्ये राहतात पण उमेदवारी त्यांनी माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला दिली. ते कार्यकर्त्याची भावना जपणारे नेते होते. एकनाथ शिंदे साहेबांकडे पाहा त्यांचे सुपुत्र हे तीन वेळचे खासदार असताना सुद्धा त्यांनी आपल्या मुलाला केंद्रात मंत्री बनवले नाही, तर एका निष्ठावंत शिवसैनिकाला ती संधी दिली. राजसाहेबांना मी विनंती करतो माझ्यासारख्या कार्यकर्त्यांवर अन्याय करू नका. मला आपले समर्थन द्या.” (Maharashtra Assembly Poll)
मी चाळीस वर्षापासून शिवसेनेचा कार्यकर्ता आहे. आम्ही आमच्या कष्टाने आणि घामाने तीन वेळा माहिमचा आमदार झालो.
बाळासाहेब असते तर त्यांनी मला आपल्या नातेवाईकांसाठी सीट सोडायला सांगितलं नसतं. त्यांचे पन्नास नातेवाईक दादर – माहिम मध्ये राहतात पण उमेदवारी त्यांनी माझ्यासारख्या सामान्य…
— Sada Sarvankar (@misadasarvankar) October 30, 2024
बस्स की आता… झालं ना वय
सरवणकर यांच्या पोस्टवर नेटकऱ्यांनी त्यांच्यावर जोरदार टीका केली आणि त्याग करण्याचा सल्ला दिला. एकाने तर “सरवणकर. बस्स की आता… झालं ना वय.. आराम करा. मोठ्या मनाने माघार घ्या…” असे म्हटले. तर एकाने, “3 वेळा आमदार आहात, सोडा ना सीट एका कर्तृत्ववान युवकासाठी, ३ वेळा आमदार असूनही किती ती हाव,” असे मत मांडले. एकाने सल्ला दिला की, “विनंती आहे आपल्याला सन्मानाने सोडा सीट अमित ठाकरे साठी, तुमच्या बद्दल लोकांच्या इज्जत वाढेल.” (Maharashtra Assembly Poll)
(हेही वाचा – Ind vs NZ, 3rd Test : मुंबई कसोटीसाठी आधीचाच संघ ठेवणार की, राहुलला मिळणार संधी?)
कशाला रडतो, गिडगिडतो?
काही नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया जशाच्या तशा :
“अरे कशाला थापा मारतोस चाळीस वर्षापासून शिवसेनेचा कार्यकर्ता – मग मधे कॉंग्रेस का फिरून आला आम्ही आमच्या कष्टाने आणि घामाने ३ वेळा माहिमचा आमदार झालो – मग आता कशाला रडतो गिडगिडतो. आहे हिंमत तर दाखव कष्ट.”
“असं काय करणार आहात तुम्ही ह्या पाच वर्षात जे मागच्या चाळीस वर्षात कार्यकर्ता म्हणून, आणि आणि पंधरा वर्षात आमदार म्हणून करता आलं नाही? मतदारांना हे सांगा, ठाकरेंना भिक कसली मागताय!”
“आम्ही लढणार माहीम जिंकणार आणि तुला का समर्थन देऊ आम्ही अमित साहेब यांना समर्थन देऊ…”.
“तुम्ही एवढे वेळेस आमदार झालाय, एक वेळेस आम्हाला पण संधी द्या! तुम्ही एवढे वर्ष आमदार, तरी तुम्हाला परत आमदार होयचा आहे, नवीन पिढीला पण चान्स दिला पाहिजे ना.”
हेही पहा –
Join Our WhatsApp Community