Maharashtra Assembly Poll : शिवसेना उबाठाची मुस्लिम मतांवर भिस्त!

69
Maharashtra Assembly Poll : शिवसेना उबाठाची मुस्लिम मतांवर भिस्त!
  • खास प्रतिनिधी 

शिवसेना उबाठा आजही मुस्लिम मतांवर लक्ष केंद्रित करून असल्याचे स्पष्ट झाले आहे. उबाठा प्रवक्ते किशोर तिवारी यांनी एका चर्चेत सहभागी होत सांगितले की उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना मुस्लिम समाजाला सुरक्षित वाटत होते, तर आता त्यांना असुरक्षित वाटते आहे. (Maharashtra Assembly Poll)

(हेही वाचा – Drugs : मुंबईत ४८४ कोटींचे अमली पदार्थ जप्त, १ हजार जणांना अटक; मागील नऊ महिन्यांतील कारवाई)

हिंदुत्व सोडले

२०१९ मध्ये उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदासाठी भाजपाशी असलेली नैसर्गिक युती तोंडली आणि पारंपारिक विरोधक काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत घरोबा करत राज्यात सरकार स्थापन करून स्वतः मुख्यमंत्री झाले. मात्र शिवसेना आमदारांना काँग्रेसची हिंदुत्वविरोधी भूमिका आणि त्यांची साथ पटत नव्हती. त्यांनी ठाकरे यांना वारंवार समजावण्याचा प्रयत्न केला पण ठाकरे यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीची साथ सोडली नाही. अखेर एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली ४० आमदारांनी बंड केले आणि भाजपाशी युती करून २०२२ मध्ये सत्तापालट करत सरकार स्थापन केले. (Maharashtra Assembly Poll)

(हेही वाचा – राज्यात CM पदाचे अनेक दावेदार; जाणून घ्या ८ मुख्यमंत्र्यांना विचित्र कारणांमुळे सोडावे लागलेले पद)

मुस्लिम मतदारांचे भरभरून मतदान

त्यानंतर मे २०२४ मध्ये पार पदळल्या लोकसभा निवडणुकीत शिवसेना उबाठाला काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत असल्याने तसेच हिंदुत्व सोडून दिल्याने, मुस्लिम मतदारांनी भरभरून मतदान केले आणि २१ उमेदवारांपैकी ९ खासदार निवडून दिले. याचा संदर्भ देत तिवारी यांनी न्यूज १८ लोकमत या न्यूज चॅनलवरील चर्चेत सहभागी होत सांगितले की, उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना मुस्लिम समाजाला सुरक्षित वाटत होते, पण आता तसे वाटत नाही. तिवारी यांच्या या व्यक्तव्यवरून उबाठाची आजही मुस्लिम मतदारांवर भिस्त असल्याचे स्पष्ट झाले आहे. (Maharashtra Assembly Poll)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.