-
सुजित महामुलकर
या विधानसभा निवडणुकीचे एक खास वैशिष्ठ म्हणजे सख्ख्या भावांच्या तीन जोड्या यावेळी निवडणूक रिंगणात दिसणार आहेत. (Maharashtra Assembly Poll)
पहिली जोडी भाजपाची
भाजपा आणि शिवसेनेने या विधानसभा निवडणुकीत आपापल्या पहिल्या उमेदवार यादीत एक-एक सख्ख्या भावांच्या जोडीला उमेदवारी दिली आहे. या विषयावर चर्चा थांबत नाही तोच महायुतीकडून तिसऱ्या सख्ख्या भावाची जोडी बुधवारी २३ ऑक्टोबर २०२४ ला मतदारांसमोर येईल, अशी शक्यता आहे. (Maharashtra Assembly Poll)
(हेही वाचा- Edible Oil Prices : फराळाच्या गोडव्याला महागाईची झळ; खाद्यतेलाच्या किंमतीत लक्षणीय वाढ)
भाजपाने पहिल्या यादीत मुंबई भाजपा अध्यक्ष आशीष शेलार यांना वांद्रे पश्चिम विधानसभा मतदार संघातून उमेदवारी जाहीर केली तर मालाड विधानसभा मतदार संघातून आशीष यांचे सख्खे मोठे बंधू विनोद यांना उमेदवारी देण्यात आली आहे. (Maharashtra Assembly Poll)
दुसरी जोडी शिवसेना यादीत
महायुतीतील दूसरा पक्ष शिवसेनेनेदेखील आपल्या पहिल्याच यादीत दोन सख्ख्या भावांना स्थान दिले आहे. कोकणातील रत्नागिरीचे आमदार आणि विद्यमान मंत्री उदय सामंत यांना शिवसेनेने पुन्हा एकदा रत्नागिरीतून उमेदवारी दिली आहे तर त्याचे सख्खे मोठे बंधू किरण सामंत यांना राजापूर मतदार संघातून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. यामुळे विरोधकांना भाजपा आणि शिवसेनेवर घराणेशाहीचा आरोप आणि टीका करण्याची आयती संधीच दिली आहे. (Maharashtra Assembly Poll)
(हेही वाचा- Eknath Shinde : शिवसेनेची पहिली यादी जाहीर; ४५ उमेदवारांचा समावेश)
तिसरी जोडी भाजपा – सेना
आता तिसऱ्या सख्ख्या भावाची मैदानात ‘एन्ट्री’ होणार असून तिसरी जोडीही कोकणातीलच आहे. मात्र या सख्ख्या भावांची वाटणी भाजपा एक आणि शिवसेना एक, अशी होण्याची शक्यता आहे. भाजपा खासदार नारायण राणे यांचे आमदार पुत्र नितेश राणे यांना भाजपाने पहिल्या यादीत स्थान दिले असून त्यांना कणकवली मतदार संघातून उमेदवारी जाहीर झाली आहे. तर त्यांचे मोठे बंधू माजी खासदार निलेश यांची उमेदवारी बुधवारी २३ ऑक्टोबर २०२४ ला शिवसेना (शिंदे) पक्षाकडून घोषित होण्याची शक्यता आहे. पूर्वाश्रमीचे शिवसैनिक निलेश २० वर्षांनंतर पुन्हा एकदा ‘धनुष्यबाण’ हातात घेणार असून बुधवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत निलेश यांचा शिवसेनेत पक्ष प्रवेश होईल आणि त्याचवेळी त्यांची कुडाळ विधानसभा मतदार संघाचे उमेदवार म्हणून घोषणा होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्यामुळे सख्ख्या भावांची ही या निवडणुकीतील ही तिसरी जोडी असणार आहे. (Maharashtra Assembly Poll)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community