राज्यात होवू घातलेल्या विधानसभा निवडणूकीत ज्या विविध राजकीय पक्षांनी आपापल्या उमेदवारांच्या नावाची घोषणा केली आहे असे रिंगणातील दिग्गज नेते गुरूवारी गुरुपुष्यामृताचा मुहूर्त साधून आपले उमेदवारी अर्ज जोरदार शक्तिप्रदर्शन करत दाखल करणार आहेत.त्यावेळी काही तगडे अपक्ष उमेदवारही आपले अर्ज दाखल करण्याची शक्यता वर्तविण्यात येत असून याचदिवशी ते आपल्या प्रचाराचाही नारळ फोडणार आहेत. (Maharashtra Assembly Poll)
या उमेदवारांमध्ये महायुती मधील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,अजित पवार यांच्यासहीत मंत्री छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, तरं उध्दव ठाकरे यांच्या शिवसेनेकडून त्यांचे वरळी मतदार संघाचे उमेदवार व युवा सेनानेते आदित्य ठाकरे यांचा समावेश असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. येत्या गुरुवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे कोपरी-पाचपाखाडी विधानसभा मतदारसंघासाठी आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.मात्र त्यापूर्वीच त्यांच्या गटाकडून लाडक्या भावाचा अर्ज भरू या, असे आवाहन मतदारसंघातील महिला वर्गाला करण्यात आलेले असून मुख्यमंत्री शिंदे हे आयटीआय वागळे इस्टेट येथे अर्ज दाखल करणार आहेत.यावेळी शिवसेना खासदार नरेश म्हस्के,डॉ.श्रीकांत शिंदे यांच्यासह पक्षाचे बहुतांश आमदार,खासदार, महिला व पुरुष पदाधिकारी,नेते,कार्यकर्ते राज्यभरातून मोठ्या संख्येने उपस्थित राहणार असल्याने पोलिसांसमोर कायदा व सुव्यवस्था राखण्याचे अवघड आव्हान उभे राहणार असल्याची दाट शक्यताही यावेळी वर्तविण्यात आली. (Maharashtra Assembly Poll)
राष्टवादी काँग्रेस अजित पवार गटाचे येवला विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार व मंत्री छगन भुजबळ हे सुद्धा गुरुवारीच आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.यानिमित्तानेही भुजबळ समर्थकांकडून जोरदार शक्तिप्रदर्शन करण्यात येणार असून भुजबळ यांच्या येवला येथील संपर्क कार्यालयातून प्रचंड मोठी रॅली काढण्यात येणार आहे.तरं पुणे जिल्ह्यातील आंबेगाव विधानसभा मतदारसंघातील अजित पवार गटाचेच उमेदवार व मंत्री दिलीप वळसे पाटील हे सुद्धा २४ ऑक्टोबरला अर्ज भरणार आहेत.तसेच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आदित्य ठाकरे हे सुध्दा गुरुवारीच वरळीमधूनआपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. (Maharashtra Assembly Poll)
(हेही वाचा- Maharashtra Assembly Election 2024 : पहिल्याच दिवशी राज्यातून ५७ उमेदवारांचे ५८ अर्ज दाखल )
दरम्यान,गुरुवार २४ ऑक्टोबरला बहुतांश पक्षाचे व अपक्ष उमेदवार आपला उमेदवारी अर्ज भरणार असल्याने तत्पूर्वी महाविकास आघाडीतील जागावाटप अंतिम करून उमेदवार जाहीर केले जातील, अशी माहिती काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मंगळवारी प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना दिली. (Maharashtra Assembly Poll)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community