Maharashtra Assembly session: अजित पवारांनी घेतली फडणवीसांची खुर्ची!

124

राज्यात सत्तेत असलेल्या शिंदे-भाजप सरकारने सोमवारी झालेला विश्वासदर्शक ठराव जिंकला आहे. त्यामुळे आता शिंदे-भाजप सरकारला अधिकृतरित्या मान्यता मिळाली आहे. सोमवारी विधान भवनात झालेल्या बहुमत चाचणीत शिंदे-भाजप आघाडीने १६४ मतं मिळवत विजय मिळवला. विधानसभा अध्यक्ष निवडणुकीच्या निमित्ताने शिंदे-भाजपा सरकारने पहिली लढाई जिंकल्यानंतर विश्वासदर्शक ठरावही जिंकला. त्यामुळे महाविकास आघाडीकडून विरोधी पक्ष नेता निवडण्यात आला. त्यामुळे पुढील काळात अजित पवार देवेंद्र फडणवीस यांची जागा घेताना दिसणार आहे.

दरम्यान, अजित पवार विरोधी पक्ष नेता म्हणून देवेंद्र फडणवीसांची खुर्ची घेणार असून सभागृहात शिंदे सरकार विरूद्ध अजित पवार यांची जुगलबंदी पाहायला मिळणार आहे. सोमवारी सभागृहात बहुमत सिद्ध केल्यानंतर बहुमताचा प्रस्ताव मंजुरीसाठी बाहेरून मदत करणाऱ्यांचे देवेंद्र फडणवीसांनी आभार मानले.

(हेही वाचा – Maharashtra Assembly session: ‘मविआ’ला आणखी एक धक्का, ९ मतं झाली कमी)

असे झाले मतदान

बहुमताच्या चाचणीत शिंदे-भाजप आघाडीने १६४ मतं मिळवली आहेत. तर महाविकास आघाडीच्या पारड्यात केवळ ९९ मतं पडली आहेत. यामध्ये एमआयएम आणि समाजवादी पक्षाच्या एकूण तीन आमदारांनी तटस्थ भूमिका घेतली आहे. तर रविवारी झालेल्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजपच्या राहुल नार्वेकर यांना १६४ तर महाविकास आघाडीला १०७ मतं मिळाली होती. या निकालामुळे बहुमत चाचणी ही केवळ औपचारिकता राहिली होती. शिंदे-भाजप आघाडीचा विजय हा निश्चित मानला जात होता. आजच्या या निवडणुकीत एकूण २८७ आमदारांपैकी २७१ आमदारांनी प्रत्यक्ष मतदानात सहभाग घेतला. यामध्ये समाजवादी पक्षाच्या दोन, तर एमआयएमच्या एका आमदाराने तटस्थ भूमिका घेतली.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.