Maharashtra Assembly session: विधानसभा अध्यक्ष पदाच्या निवडणूकीची मतमोजणी सुरू, नार्वेकरांना १६४ मते

85

शिवसेनेतून ३९ आमदार वेगळे करून स्वतंत्र गट स्थापन करण्याच्या तयारीत असलेल्या एकनाथ शिंदे यांच्यामुळे ठाकरे सरकार अल्पमतात आले आणि कोसळले. त्यानंतर अनपेक्षित पणे भाजपने थेट एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री बनवले. राज्यपालांच्या आदेशानुसार रविवार, ३ जुलै रोजी विधानसभेचे विशेष अधिवेशन घेण्यात येत आहे. त्यामध्ये विधानसभा अध्यक्ष पदाची निवडणूक सुरू आहे.

(हेही वाचा – Maharashtra Assembly session: विधानभवनातील शिवसेनेचं विधिमंडळ कार्यालय सील)

विधानसभेच्या अध्यक्ष निवडीसाठीच्या विशेष अधिवेशनाच्या सुरूवातीस भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राहुल नार्वेकर यांच्या अध्यक्षपदाचा प्रस्ताव सभागृहात मांडाला. या प्रस्तावानंतर उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी तो प्रस्ताव मतदानास टाकला. आवाजी मतदानात बहुमताच्या बाजूने प्रस्ताव पारित होणार इतक्यातच विरोधी पक्षाकडून पोलची मागणी करण्यात आली. त्यानुसार उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी हा प्रस्ताव मतदानास टाकला. त्यानंतर बहुमाताच्या बाजूने असणाऱ्यांना उपाध्यक्षांच्या उजव्या बाजूला आणि बहुमाच्या प्रस्तावाच्या विरोधात असणाऱ्यांना डाव्या बाजूस येण्यास सांगितले. त्यानुसार शिरगणती सुरू करण्यात आली, यावेळी भाजपच्या राहुल नार्वेकरांना १६४ मतं मिळाल्याचे पाहायला मिळाले.

राहुल नार्वेकर हे मुंबईतील कुलाबा येथील भारतीय जनता पक्षाचे आमदार आहेत. त्यांची निवड झाल्यानंतर या पदावर बसणाऱ्या सर्वात तरुण अध्यक्षांमध्ये ते आहेत. भारतीय जनता पक्ष, शिवसेना शिंदे गटातील आमदार आणि अपक्षांनी राहुल नार्वेकर यांच्या बाजूने मतदान केले. शिवसेनेचे उर्वरित आमदार, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांनी शिवसेनेचे उमेदवार राजन साळवी यांच्या समर्थनार्थ मतदान केले. प्रत्यक्ष मोजणीच्या आधारे शिरगणती पद्धतीने हे मतदान होत आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.