राज्य विधीमंडळाचे पावसाळी अधिवेशन सध्या सुरू आहे. या अधिवेशनादरम्यान बुधवारी विधीमंडळाच्या पाय-यांवर विरोधक आणि सत्ताधारी आमदारांमध्ये जोरदार खडाजंगी झाल्याचे पहायला मिळाले. शिंदे गटाचे आमदार महेश शिंदे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांच्यात यावेळी बाचाबाची झाली. त्यावरुन आता महेश शिंदे यांनी मिटकरी यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे.
मिटकरींवर कारवाई करावी
राज्याच्या राजकारणाला लागलेला काळा डाग म्हणजे अमोल मिटकरी. त्यांचं आजचं वर्तन संपूर्ण राज्याने पाहिले आहे. अमोल मिटकरी यांनी सुरुवातीला आम्हाला धक्काबुक्की केली आणि आंदोलनाला वेगळं रुप मिळालं. अमोल मिटकरी हे लोकशाहीवादी विचारांचे नेते नाहीत. त्यांचे विचार जहाल आणि चुकीचे आहेत, अशी टीका महेश शिंदे यांनी केली आहे. तसेच लोकशाहीला धोका निर्माण करणा-या अशा माणसांवर त्यांच्या पक्षाकडून कारवाई करण्यात यावी, अशी मागणीही शिंदे यांनी केली आहे.
(हेही वाचाः ‘लॉटरीमध्ये विरोधी पक्षनेतेपद मिळालं म्हणून बारामतीच्या पोपटाने बरळू नये’, मनसेचा दानवेंना थेट इशारा)
हे अशोभनीय वर्तन
अधिवेशन सुरू झाल्यापासून सातत्याने विरोधकांकडून घोषणाबाजी करत आम्हाला चिथावण्याचा प्रयत्न करण्यात येत होता. बुधवारी विधीमंडळाच्या पाय-यांवर आम्ही सर्व आमदार एकत्र येऊन शांतपणे आंदोलन करत होतो. मात्र या शांततापूर्ण आंदोलनाला विरोधकांनी गालबोट लावण्याचा प्रयत्न केला. आक्षेपार्ह भाषा वापरत त्यांच्याकडून धक्काबुक्की करण्यात आली. त्यामुळे विधीमंडळाच्या आवारातील त्यांचे हे वर्तन अशोभनीय आहे.
मागील अडीच वर्षांत महाविकास आघाडीने केलेल्या गैरकारभारांचा पर्दाफाश आम्ही करत होतो, ते त्यांना सहन झालं नाही म्हणूनच त्यांनी आमचं हे आंदोलन दाबण्याचा प्रयत्न केला, अशी टीका महेश शिंदे यांनी केली आहे.
Join Our WhatsApp Community