राज्याचे हिवाळी अधिवेशनाचा (Maharashtra Assembly Session) समारोप बुधवार, २० डिसेंबर रोजी झाला. पुढील विधिमंडळ अधिवेशन २६ फेब्रुवारी रोजी सुरू होईल, अशी घोषणा विधानसभा अध्यक्षांनी केली. फेब्रुवारीमध्ये होणारे अधिवेशन अर्थसंकल्पीय अधिवेशन असणार असून ते शिंदे सरकारचे शेवटचे अर्थसंकल्पीय अधिवेशन असणार आहे.
या हिवाळी अधिवेशनात (Maharashtra Assembly Session) एकूण बैठकांची संख्या १० होती, प्रत्यक्षात कामकाज १०१ तास १० मिनिटे इतके झाले. वाया गेलेला वेळ निरंक होता, रोज सरासरी १० तास ५ मिनिटे इतके कामकाज झाले. या अधिवेशनात एकूण तारांकीत प्रश्न ७,५८१ होते, स्वीकृत प्रश्न २४७, उत्तरित झालेले प्रश्न ३४ होते.
अल्पकालिन चर्चा ३ प्राप्त झाल्या, त्यातीस २ मान्य झाल्या. अशासकीय ठराव एकूण २६३ प्राप्त झाले, १८७ मान्य झाले पण एकाही ठरावावर चर्चा झाली नाही. एकूण लक्षवेधी सूचना २,४१४ प्राप्त झाल्या, स्वीकृत सूचना ३३७ होत्या, तर चर्चा झालेल्या ७० होत्या.
एकीकडे राज्यात विधिमंडळ अधिवेशनाचा (Maharashtra Assembly Session) आज शेवटचा दिवस असताना विरोधी पक्ष वेगवेगळ्या मुद्द्यांवरून आक्रमक झाल्याचं दिसून येत आहे. तर दुसरीकडे शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांसमोर चालू असलेल्या सुनावणीचा आज शेवटचा दिवस आहे. शिंदे गटाच्या बाजूने आज जेठमलानी आपला युक्तिवाद सादर करतील. या दोन महत्त्वपूर्ण घडामोडींमुळे राज्याचं राजकीय वातावरण तापल्याचं पाहायला मिळत आहे.
Join Our WhatsApp Community