Assembly Winter Session : विधानसभा अध्यक्षांकडून ‘हिंदुस्थान पोस्ट’च्या बातमीची दखल; पासेस रद्द; गर्दीला आळा!

157
Assembly Winter Session : विधानसभा अध्यक्षांकडून ‘हिंदुस्थान पोस्ट’च्या बातमीची दखल; पासेस रद्द; गर्दीला आळा!
  • खास प्रतिनिधी

‘हिंदुस्थान पोस्ट’ने गुरुवारी १९ डिसेंबर २०२४ या दिवशी, सायंकाळी मुख्यमंत्र्यांच्या आवाहनानंतरही विधान भवन परिसरातील गर्दी कमी झाली नसल्याबाबत बातमी प्रसारित केली होती. त्यानंतर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी बातमीची तात्काळ दखल घेत अभ्यागतांसाठी देण्यात येणारे प्रवेशपत्र स्थगित करण्याचे आदेश काढले. त्यामुळे शुक्रवारी २० डिसेंबर या दिवशी नागपूर विधान भवन परिसरातील गर्दी आटोक्यात आल्याचे चित्र दिसले. (Assembly Winter Session)

(हेही वाचा – Maharashtra Assembly Winter Session : मुख्यमंत्र्यांच्या आवाहनाला आमदारांकडून हरताळ!)

मुख्यमंत्र्यांची कसरत

‘हिंदुस्थान पोस्ट’ने गुरुवारी सायंकाळी ‘मुख्यमंत्र्यांच्या आवाहनाला आमदारांकडून हरताळ!’ अशा आशयाची बातमी प्रसिद्ध केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईतील विशेष अधिवेशनात आमदारांना कार्यकर्त्यांची गर्दी कमी करण्याचे आवाहन केले होते. “वाईट वाटेल पण विधान भवनमधील गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी उपाययोजना करण्याची गरज आहे अन्यथा काम करणे कठीण होईल,” असे सांगून ते पुढे म्हणाले होते की “अनेक मंत्र्यांच्या दालनात जाण्यासाठी मार्ग मिळत नाही.” फडणवीस यांच्या आवाहनाला सर्वच आमदारांनी समर्थन दिले पण प्रत्यक्षात गर्दीचा ओघ काही कमी झालेला दिसला नाही, असे या बातमीत नमूद करण्यात आले होते. खुद्द मुख्यमंत्र्यांना गुरुवारी कार्यालयातून बाहेर पडून गाडीपर्यंत जाताना मोठी कसरत करावी लागली होती. (Assembly Winter Session)

(गुरुवार १९ डिसेंबर रोजी मुख्यमंत्र्यांच्या दालनासमोर झालेल्या प्रचंड गर्दीचा व्हिडीओ)

सर्व पासेसना स्थगिती

विधानसभा अध्यक्ष नार्वेकर यांनी आदेश काढत ‘सर्व पासेस पुढील आदेश येईपर्यंत स्थगित करण्यात यावेत’ अशा सूचना संबंधित सचिव, मुख्य सुरक्षा अधिकारी आणि कक्ष अधिकाऱ्यांना दिले आणि त्यामुळे शुक्रवारी विधान भवन परिसरातील गर्दीला आळा बसला. (Assembly Winter Session)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.