ठरलं! विधीमंडळाचं हिवाळी अधिवेशन मुंबईतच होणार

88

हिवाळी अधिवेशन हे परंपरेनुसार नागपूरला होत असते पण गेल्यावर्षी कोरोना महामारीमुळे हे अधिवेशन मुंबईतच झाले होते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची प्रकृती तसेच विधान परिषदेची निवडणूक यामुळे यंदा हिवाळी अधिवेशन नागपूर ऐवजी मुंबईत भरवले जाणार असल्याची चर्चा होती. अखेर हिवाळी अधिवेशन मुंबईतच घेण्याच महाविकास आघाडी सरकारच्या मंत्रिमंडळ बैठकीत हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला.

 22 ते 29 डिसेंबरला अधिवेशन मुंबईत होणार 

हिवाळी अधिवेशन मुंबईतच होणार असल्याच्या वृत्तावर शिक्कामोर्तब झाल्याने विधिमंडळ हिवाळी अधिवेशन येत्या 22 ते 28 डिसेंबरला मुंबईत करण्याचे राज्य सरकारचे नियोजन आहे. सोमवारी म्हणजेच 29 डिसेंबर रोजी संसदीय कामकाज समितीची बैठक होणार आहे. या बैठकीत या तारखांवर अधिकृत शिक्कामोर्तब होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

(हेही वाचा – राज्यात १ डिसेंबरपासून शाळेत सुरू होणार मुलांचा किलबिलाट!)

डोस घेतले तरी RTPCR अनिवार्य

यंदाचे हिवाळी अधिवेशन कोरोना महामारीदरम्यान होत आहे. त्यामुळे सहभागी होणाऱ्या विधिमंडळ सदस्यांपासून तर कर्मचाऱ्यांपर्यत लसीकरणाचे दोन डोस पूर्ण असणे अनिवार्य करण्यात आले आहे. कोरोनाचे दोन्ही डोस घेतल्यानंतरही या अधिवेशनादरम्यान प्रत्येकाला आरटीपीसीआर टेस्ट करणे अनिवार्य असणार आहे. त्यामुळे विधीमंडळ सदस्य, त्यांचे स्वीय सहायक, सर्व अधिकारी-कर्मचारी, वृत्तसंकलनासाठी येणारे माध्यम प्रतिनिधी, सुरक्षेसाठी तैनात असणारे पोलीस, राज्यभरातून येणारे वाहन चालक या सर्वांच्या आरटीपीसीआर टेस्ट अधिवेशन सुरू होण्यापूर्वी पूर्ण करण्याची सूचना विधीमंडळाकडून करण्यात आली आहे.

Join Our WhatsApp Community

Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.