राज्याच्या हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विधानसभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आमदार भास्कर जाधवांनी नक्कल केली, त्यामुळे विरोधकांनी गदारोळ माजवला. मात्र आता भाजपने या अधिवेशनात रणनीती बदलली आहे. यंदाच्या अधिवेशनात सरकारचा अंदाधुंद कारभार बाहेर काढण्याची मोठी संधी आहे, तेव्हा कामकाज होऊ द्या, सरकारला उघडे पडा, असा आदेश विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे.
सरकारच्या विरोधात बरेच मुद्दे
अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव यांनी विधानसभेत थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नक्कल केली. त्यामुळे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी तीव्र आक्षेप घेत, जाधव यांनी माफी मागण्याचा आग्रह धरला. त्यासाठी एक तास सभागृहात विरोधकांनी गदारोळ माजवला होता. मात्र यंदाच्या अधिवेशनात पुन्हा गोंधळ घालायचा नाही, सभागृहातील कामकाजात सहभागी व्हा, सरकारला कोंडीत पकडण्यासाठी बरेच मुद्दे आहेत, त्यामाध्यमातून सरकारला उघडे पाडा. जनतेला सरकारचे खरे रूप दाखवून द्या, असे विरोधी पक्षनेते फडणवीस म्हणाले.
( हेही वाचा मुख्यमंत्र्यांच्या अधिवेशनातील उपस्थितीसाठी ‘खास’ रस्ता, संदीप देशपांडे म्हणाले…)
परीक्षा घोटाळ्यावर चर्चा
अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी विधान सभेत परीक्षा घोटाळ्यावर जोरदार चर्चा होण्याची शक्यता आहे. त्यावेळी सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न विरोधक करणार आहेत.
Join Our WhatsApp Community