अयोध्येतील महाराष्ट्र भवनाला बाळासाहेब ठाकरेंचे नाव देणार – मुख्यमंत्री शिंदे

132

अयोध्येत राम मंदिर व्हावे, काश्मीरमध्ये ३७० कलम हटावे, मला एक दिवसासाठी पंतप्रधान बनवा असे बाळासाहेब म्हणाले होते. अमित शहा डॅशिंग गृहमंत्री आहेत. वाटले होते का ३७० कलम हटेल. पण हटवले. राम मंदिराचे काम प्रचंड वेगात सुरु आहे. मोदींच्या नेतृत्वात हे सारे घडत आहे असे सांगत अयोध्येतील महाराष्ट्र भवनाला बाळासाहेब ठाकरेंचे नाव देणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली.

मुख्यमंत्री शिंदे यांनी अयोध्या दौऱ्यावेळी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी काँग्रेस, ठाकरे, अजित पवार यांच्यावर जोरदार टीका केली. फडणवीस दिल्लीला महत्वाच्या बैठकीला जात होते, ते अयोध्येला आले. आम्ही खुलेआम आलोय, आम्हाला कोणाचाही आड पडदा नाही. आजची ही अयोध्या यात्रा आहे ही माझ्यासाठी फार परमोच्च आनंदाचा दिवस आहे. धनुष्यबाण मिळाल्यानंतर उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतोय, असे शिंदे म्हणाले. हिंदुत्वाची अॅलर्जी आणि बदनाम करण्याचे काम केले जातेय. वीर सावरकरांचा अपमान केला. दोन्ही काॅंग्रेससोबत सरकारमध्ये असताना काॅंग्रेसने वीर सावरकर यांचा अवमान केला, काॅंग्रेसचा निषेध करणारा साधा ठराव मांडता आला नाही, असेही मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.

(हेही वाचा पंतप्रधान मोदींनी बाळासाहेब ठाकरे, करोडो रामभक्तांचे स्वप्न पूर्ण केले – मुख्यमंत्री शिंदे)

हिंदुत्व घराघरात पोहोचले तर आपले दुकान बंद होईल. त्याचे बंद होतच आलेले आहे. काहीजण परदेशात जाऊन देशाला बदनाम करण्याचे काम करतात. जनता सुज्ञ आहे. आम्ही आमचे विचार पुढे नेत जाऊ. आमच्या सरकारमध्ये साधू कांड होणार नाही, वचन देतो. डॉक्टरेट मिळण्यावरून शिंदे म्हणाले, मी अगोदरच डॉक्टर होतो, म्हणून तर एवढे मोठे ऑपरेशन केले. यांना छोट्या मोठ्या गोळ्याच पुरेशा आहेत. रावण राज्य म्हणणे हा रामांचा अपमान आहे. त्यांना मी सांगू इच्छितो, जेव्हा साधूंचे मॉब लिचिंग झाले तेव्हा कोणाचे सरकार होते. एका नेव्हल अधिकाऱ्याला मारले तेव्हा कोणाचे सरकार होते. राणा कुटुंबीयांना तुरुंगात टाकले तेव्हा कोणाचे सरकार होते. दाऊदशी संबंध असलेल्या मंत्र्याचा राजीनामा घेऊ शकला नाही. परवा पालघरमध्ये दोन साधुंचे हत्याकांड आपल्या लोकांनी वाचविले, हे रामाचे राज्य असल्याचा दावा शिंदे यांनी केला. आदित्य ठाकरेंचा जन्म झाल्यापूर्वीपासून मी शिवसेनेत काम करतोय, त्याच्यावर काय बोलू. अजित पवार उपमुख्यमंत्री होते, नेते आहेत. रामभक्तांना फालतुगिरी म्हणताय तुम्हाला रामभक्तच धडा शिकवतील, असे प्रत्यूत्तर शिंदे यांनी दिले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.