स्थानिक स्वराज्य संस्था, लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांना अवघे काही महिने शिल्लक असताना प्रदेश भाजपाकडून (Maharashtra BJP) जिल्हाध्यक्ष बदलांचे संकेत मिळत आहेत. प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी, ६ जून रोजी कोअर कमिटीची बैठक आयोजित करण्यात आली असून, या बैठकीत राज्यातील सर्व महानगरे आणि जिल्ह्यांचे अध्यक्ष बदलण्यात येतील, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
भाजपाने (Maharashtra BJP) राज्यात लोकसभेच्या किमान ४२ जागा जिंकण्याचे मिशन हाती घेतले आहे. ते यशस्वी करायचे असेल, तर आमदारांना जिल्हाध्यक्ष पदाच्या जबाबदारीतून मोकळे करायचे आणि लोकसभा निवडणुकीसाठी तयार केल्या जाणाऱ्या समित्यामध्ये घ्यायचे, असा विचार केला जात आहे. प्राप्त परिस्थितीत डझनभर जिल्हाध्यक्ष वा महानगर अध्यक्ष हे विद्यमान आमदार आहेत. आता नवीन जिल्हाध्यक्ष नेमताना आमदारांना संधी द्यायची नाही, असा निर्णय झाल्याचे कळते.
(हेही वाचा – Manohar Joshi : मनोहर जोशी अतिदक्षता विभागातून बाहेर; मात्र प्रकृती ‘जैसे थे’)
त्यांच्या जागी नवीन चेहऱ्यांना संधी दिली जाऊ शकते. असे असले तरी, मुंबई भाजपाच्या (Maharashtra BJP) अध्यक्षपदी आमदार आशिष शेलार कायम राहतील. महापालिका, लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने त्यांच्याकडेच अध्यक्ष पद कायम राहणार आहे.
निवडीचे निकष असे…
– बावनकुळे यांनी आधी ७० टक्के जिल्हाध्यक्ष बदलाचे संकेत दिले होते. मात्र आता १०० टक्के नवीन चेहरे देण्याचा निर्णय झाला आहे.
– पक्षासाठीचे (Maharashtra BJP) योगदान, कार्यकत्यांच्या भावना, पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांकडून मिळालेला फीडबॅक आणि संघ परिवारातील प्रमुख व्यक्तींनी दिलेला सल्ला, या आधारावर नवीन नियुक्त्या करण्यात येतील.
– मोदी @ ९ हे अभियान ३० जूनपर्यंत चालणार आहे. त्याच्या मध्येच बदल करायचे की नंतर यावर अद्याप निर्णय झालेला नाही.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community