भाजपसाठी पॉझिटिव्ह बातमी! देवेंद्र फडणवीस Corona निगेटिव्ह

131

राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांना ५ जून रोजी कोरोनाची लागण झाली होती. त्यांना कोरोनाची लागण झाल्यानंतर याची माहिती त्यांनी स्वतः ट्विटर दिली होती. मात्र आज, गुरूवारी भाजपसाठी एक पॉझिटिव्ह आणि दिलासादायक बातमी आहे ती म्हणजे देवेंद्र फडणवीस हे कोरोनामुक्त झाले असून त्यांचा कोरोना अहवाल निगेटिव्ह आला आहे. त्यामुळे फडणवीस पुन्हा एकदा अॅक्टिव्ह होऊन राजकीय बैठकींना हजर राहणार असल्याचे सांगितले जात आहे.

(हेही वाचा – मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना शिराळा न्यायालयाकडून अजामीनपात्र वॉरंट)

फडणवीस पुन्हा एकदा अॅक्शन मोडमध्ये

दरम्यान, देवेंद्र फडणवीस कोरोना निगेटिव्ह आल्यानंतर पुन्हा एकदा अॅक्शन मोडमध्ये आले आहेत. राज्यात राज्यसभा निवडणुकींचा एकच धुराळा पाहायला मिळत आहे. यापार्श्वभूमीवर फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर भाजप नेत्यांची बैठक होत आहेत. या बैठकीत राज्यसभेसह विधानपरिषद निवडणुकांची चर्चा होणाऱ असल्याचे सांगितले जात आहे. देवेंद्र फडणवीस लातूर दौऱ्यावर असताना त्यांना अचानक ताप आला होता. त्यामुळे त्यांनी त्यांचा दौरा रद्द केला होता. आगामी राज्यसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर फडणवीसांचा सोलापूर दौरा महत्त्वपूर्ण मानला जात होता. मात्र खबरदारीचा उपाय म्हणून त्यांनी कोरोना चाचणी करून घेतली होती. यावेळी त्यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली होती.

फडणवीसांनी केले होते आवाहन

देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी ट्वीट करत त्यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती दिली होती. त्यानंतर त्यांची प्रकृती स्थिर होत असताना ते होम आयसोलेशनमध्ये होते. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार औषधोपचार सुरू असल्याचे त्यांनी सांगितले होते. यावेळी त्यांनी आवाहन करत माझ्या संपर्कात आलेल्यांना कोविड चाचण्या करून घेण्याचा सल्ला देखील दिला होता.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.