“… तर उद्धव ठाकरे वाऱ्याने उडून गेले असते”, नितेश राणेंचा हल्लाबोल

86

शनिवारी मुंबईतील बीकेसी मैदानात शिवसेनेची जाहीर सभा झाली. या सभेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी भाजपसह देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करत हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून फटकारले. त्यानंतर अनेक भाजप नेत्यांनी मुख्यमंत्र्यावर निशाणा साधला आहे. या वेळी त्यांनी फडणवीसांवर टीका केली. या टीकेला प्रत्युत्तर देताना भाजप आमदार नितेश राणे म्हणाले, तुमच्या मुलाला म्याऊ म्याऊ म्हटलं की राग येतो, मग दुसऱ्यांच्या वजनांबद्दल आणि आवाजाबद्दल तुम्हाला बोलण्याचा काय अधिकार…

(हेही वाचा – राज ठाकरेंचा ‘वसंता’ अजूनही नाराज? ‘मनसे’च्या पत्रिकेतून नावंच गायब, काय म्हणाले मोरे?)

नितेश राणेंचा हल्लाबोल

यापुढे ते असेही म्हणाले, उद्धव ठाकरेंना हिंदुत्त्वावर बोलण्याचा अधिकार नाही. त्यांची सभा पाहिल्यानंतर जे औषधे सध्या ते घेत आहेत. त्यांचा परिणाम त्यांच्यावर होत असल्याचे जाणवले. त्यांच्या डॉक्टरांना माझी विनंती आहे त्यांनी आपल्या पेशेंन्टकडे जरा लक्ष द्यावे. अवेळी बोलणे, विषयाच्या आजूबाजू पण न राहणे आणि बडबडत राहणे, असा आजार राज्याच्या मुख्यमंत्र्यांना लागला असून त्यांची मला चिंता आहे, अशी खोचक शब्दात त्यांनी केली आहे.

… नाहीतर सहन करण्याची ताकद ठेवा

उद्धव ठाकरे यांनी वजनावरून फडणवीस यांच्यावर केलेल्या टीकेला प्रत्युत्तर देताना नितेश राणे यांनी म्हटले, तुम्ही दुसऱ्यांच्या वजनावर बोलतात, उद्धवजी उभे असते तर हवेने उडून गेले असते आणि दुसरीकडे कुठे जाऊन पडले असते, असे आम्ही म्हटले तर चालेल का? जर तुम्हाला तुमच्याबद्दल बोललेले आवडत नसेल. तरी तुम्ही असे बोलणे थांबवा. नाहीतर सहन करण्याची ताकद ठेवा, असाही इशारा त्यांनी यावेळी दिला आहे.

काय म्हणाले होते मुख्यमंत्री?

या सभेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या बाबरी मशीद पाडताना तेथे होतो, या दाव्याची खिल्ली उडवली. बाबरी पाडली तेव्हा तुम्ही खरंच तिथे गेला असता आणि वर चढायचा प्रयत्न केला असता तर तुमच्या वजनाने बाबरी खाली आली असती.

Join Our WhatsApp Community

Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.