महाराष्ट्र भाजपचे मिशन 48, मविआला धोबीपछाड देण्याची व्यूहरचना

145

2024 च्या लोकसभा निडवणुकीसाठी भाजप आतापासूनच कामाला लागले आहे. केंद्रीय पातळीवर भाजपडून या निवडणुकांसाठी रणनीती आखली जात असतानाच, आता महाराष्ट्रातही भाजपने मिशन 48 चे लक्ष ठेवले आहे. विशेष म्हणजे शिवसेनेला धोबीपछाड देण्यासाठी भाजपने ही व्यूहरचना आखली आहे.

भाजपचे महाराष्ट्रात मिशन 48

केंद्रातील मोदी सरकारला नुकतीच 8 वर्ष पूर्ण झाली आहेत.त्यामुळे 2024 मध्ये पुन्हा एकदा केंद्रात भाजप सरकार आणण्याचा भाजप नेते आणि कार्यकर्त्यांचा मनसुबा आहे. मात्र, यावेळी भाजपचे खास लक्ष आहे ते महाराष्ट्रातील लोकसभा मतदारसंघावर. शिवसेनेने भाजपची साथ सोडल्यानंतर भाजपने आता राज्यात मिशन 48 चे लक्ष्य ठेवले आहे. यामध्ये शिवसेनेचे 18 खासदार असलेल्या लोकसभा मतदारसंघात भाजपने तयारी देखील सुरू केली आहे.दरम्यान विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी तर भाजप या 48 जागांवर विजय मिळवेल, असा विश्वास व्यक्त केला आहे.

(हेही वाचाः दादांनी मागितली ताईंची माफी! म्हणाले, मी त्रागाने…)

ताकद कमी असलेल्या बूथचा शोध घेणार

लोकसभा, राज्यसभा सदस्य, विधानसभा आणि विधानपरिषद सदस्य हे आपापल्या क्षेत्रातील आपली ताकद कमी असलेल्या बूथचा शोध घेणार आहेत. मागील निवडणुकीत पराभूत झालेले माजी आमदार आणि माजी खासदारही ताकद कमी असलेले बूथ शोधण्याच्या कामी मदत करणार आहेत. पक्षाच्या खासदारांकडून 30 जणांची टीम तयार केली जाईल. या टीमकडून कमी ताकद असलेले 100 बूथ शोधले जातील. आमदारांकडून 10 जणांची टीम नियुक्त केली जाईल, असेही भाजपकडून सांगण्यात आले आहे.

त्या अठरा जागांवर नजर

भाजपने मिशन 48 साठी अशी व्यूहरचना आखली असली तरी शिवसेनेचे 18 खासदार मोदी लाटेत निवडून आल्याची भावना भाजपची आहे.त्यामुळेच या 18 जागांकडे भाजपचे विशेष लक्ष आहे.आता भाजपचे शिवसेनेला मात देण्याचे हे स्वप्न सत्यात उतरेल का, यासाठी मात्र 2024 पर्यंत वाट पहावी लागणार आहे. तूर्तास तरी भाजप शिवसेनेच्या खासदारांची वाट बिकट करणार हेही तितकेच खरे असल्याचे राजकीय वर्तुळात म्हटले जात आहे.

(हेही वाचाः राणा दाम्पत्याच्या मागे गुन्ह्यांची ‘साडेसाती’, आणखी एक गुन्हा दाखल)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.