पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) १९ जानेवारीला, गुरुवारी मुंबई दौऱ्यावर येणार आहेत. मुंबई मेट्रोच्या मेट्रो टू ए (Mumbai Metro 2A) आणि मेट्रो सेव्हन (Mumbai Metro 7) या मार्गाचे लोकार्पण पंतप्रधान मोदींच्या हस्ते होणार आहे. तसेच विविध प्रकल्पांचे देखील मोदींच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. यावरून सध्या राज्यातील विरोधी पक्षातील नेते मोदींच्या दौऱ्यावर निशाणा साधत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विकासाची कामे कमी आणि प्रचाराची कामे जास्त करतात, अशी टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी केली. त्याला खरमरीत असे प्रत्युत्तर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी एका खासगी वृत्तवाहिनी बोलताना दिले आहे.
भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, ‘काँग्रेस पक्ष आता अस्वस्थ आहे. काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेला काही समर्थन मिळाले नाही. मोठ्या प्रमाणात प्रत्येक जिल्ह्यात बंड वगैरे करण्यात आला. विधानपरिषदेच्या निवडणुकांपासून काँग्रेसच्या अवस्थतेची सुरुवात झाली. विधानपरिषदेत मतं फुटली, राज्यसभेत मतं फुटली, मग सरकार बदल्यावर काँग्रेसची काय परिस्थिती झाली, माझ्या निवडणुकीत शेवटच्या दिवशी उमेदवार बदलला, आता विधानपरिषदेच्या निवडणुकीसाठी त्यांच्या उमेदवार ठरत नाहीये. त्यामुळे काँग्रेस पक्षात अस्वस्थता आहे, त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदींबद्दल काहीपण बोलून, टाईमपास करतायत.’
मोदींच्या मुंबई दौऱ्याविषयी बावनकुळे म्हणाले की, ‘पंतप्रधान मोदींचा दौरा राजकीय नाही. मोदी विकासाकामांचे उद्घाटन करायला येत आहेत. मुंबईकर सहन करत असलेल्या त्रासातून मुक्त करण्यासाठी, मेट्रो प्रकल्पासाठी मोदी मुंबईत येत आहेत.’
(हेही वाचा – नवाब मलिक कुटुंबियांच्या अडचणीत वाढ; आता मुलगा आणि सुनेवर गुन्हा दाखल)
Join Our WhatsApp Community