मंदिरे उघडण्यासाठी भाजपचा राज्यव्यापी शंखनाद

142

राज्यात ठाकरे सरकारने काही प्रमाणात शिथिलता दिली असताना अजूनही मंदिरे उघडण्यास परवानगी दिली नाही.  पाच महिन्यांपासून राज्यातील सर्व धार्मिक स्थळे बंद करण्यात आली आहेत. आता सर्व व्यवहार सुरळीत होत असताना धार्मिक स्थळे बंद ठेवण्याचे कारण काय, असा सवाल भाजपकडून राज्य सरकारला विचारण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर आता भाजपने सरकारचा निषेध करण्यासाठी राज्यव्यापी शंखनाद आंदोलन करण्याचा इशआरा दिला आहे.

राज्यव्यापी आंदोलन

मंदिरांवर अवलंबून असलेल्या लाखो लोकांच्या उपजीविकेवर गदा आल्याने त्यांची उपासमार होत आहे. त्यांना राज्य सरकार कोणतीही आर्थिक मदत देत नाही आणि मंदिरे देखील उघडली जात नाहीत. देशातल्या अन्य राज्यात मात्र मंदिरे सुरू आहेत. देव-धर्मावर सातत्याने अन्याय करणाऱ्या, देवी-देवतांना बंदिस्त करुन लाखो गरीबांची उपासमार करणाऱ्या ठाकरे सरकारला मंदिरे खुली करण्याचा इशारा वारंवार देण्यात आला आहे. श्रीकृष्णजयंती आणि चौथ्या श्रावण सोमवारच्या पवित्र मुहूर्तावर भाजप आध्यात्मिक समन्वय आघाडी तर्फे सोमवार ३० ऑगस्ट २०२१ रोजी सकाळी ११ वाजता राज्यव्यापी शंखनाद आंदोलन होणार असल्याची घोषणा आध्यात्मिक आघाडीचे प्रदेश संयोजक आचार्य तुषार भोसले यांनी केली आहे.

(हेही वाचाः राज्यात नाईट कर्फ्यू लागणार?)

भाजपचा आंदोलनाला पाठींबा

या आंदोलनाला भारतीय जनता पार्टीचा संपूर्णपणे पाठिंबा असून पक्षाच्या सर्व लोकप्रतिनिधी, पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी या आंदोलनात सक्रियपणे सहभागी व्हावे. आपल्या परिसरातील प्रमुख मंदिरे तसेच धार्मिक स्थळांसमोर टाळ, घंटा व शंख वाजवून “मंदिर हम खुलवायेंगे धर्म को न्याय दिलायेंगे ” हा नारा देत आंदोलन करावे. अशी सूचना भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शुक्रवारी केली.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.