गरिबांच्या भाकरी, भक्ती आणि भविष्याला मोल देणारा अर्थसंकल्प – आशिष शेलार

129

राज्यातील गरिब, कष्टकरी, कामगार, श्रमिक यांच्या घामाला, श्रमला, दैवतांना आणि त्याच्या भाकरीला मोल देणारा अर्थसंकल्प उपमुख्यमंत्री आणि राज्याचे वित्तमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सादर केला. त्याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अभिनंदन.

राज्यातील जनतेला जो जे वांच्छिल ते ते देणारा हा अर्थसंकल्प असून विकासाची यात्रा, गावातील जत्रा आणि वारकऱ्यांची दिंडी या सगळ्यांसोबत चालणारा हा अर्थसंकल्प आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात जो नारा दिला आहे त्यानूसारच “सबका साथ, सबका विकास आणि सबका प्रयास” या दिशेने भविष्यात महाराष्ट्राला उभे करणारा आजचा अर्थसंकल्प आहे. गेल्या अडिच वर्षांचा अंध:कार, नैराश्य, सततचे रडगाणे हे सारे दूर करुन आधुनिक महाराष्ट्राला प्रकाशाकडे नेणारा आशावादाचे नवनवीन संकल्प असलेला हा अर्थसंकल्प आहे, अशी प्रतिक्रिया भाजपा आमदार अँड. आशिष शेलार यांनी दिली.

(हेही वाचा Maharashtra budget 2023-2024 : तीर्थस्थळांसाठी भरीव तरतूद; महाराष्ट्रातील पाचही ज्योर्तिलिंगांचे संवर्धन)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.