Maharashtra budget 2023-2024 : तीर्थस्थळांसाठी भरीव तरतूद; महाराष्ट्रातील पाचही ज्योर्तिलिंगांचे संवर्धन

122
नाचू कीर्तनाचे रंगी…! आम्ही सारे वारकरी…या संत वचनाचे कथन करत अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील देवस्थानांसाठी यंदाच्या अर्थसंकल्पात काय तरतूद केली आहे, याची घोषणा केली. यावेळी अर्थमंत्री फडणवीस यांनी संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत सोपानदेव, संत निवृत्तीनाथ, संत मुक्ताई निर्मलवारीसाठी २० कोटींची तरतूद केली, तर कीर्तनकार, प्रवचनकार, निरुपणकार यांच्या समाजप्रबोधनाच्या कार्याचा सन्मान करत श्री संत नामदेव महाराज कीर्तनकार सन्मान योजना जाहीर करण्यात आली.

कोणत्या तीर्थस्थळांसाठी काय केली तरतूद? 

  • श्री संत सेवालाल महाराज स्मारक पोहरादेवी, उमरी तीर्थक्षेत्र विकास – ५०० कोटी रुपये
  • भीमाशंकर, त्र्यंबकेश्वर, घृष्णेश्वर, औंढा नागनाथ, वैजनाथ या पाचही महाराष्ट्रातील ज्योर्तिंलिंगांसह प्राचीन मंदिरांच्या संवर्धनासाठी – ३०० कोटी रुपये
  • श्री क्षेत्र ज्योतिबा परिसर संवर्धन प्राधिकरण – ५० कोटी रुपये
  • श्री संत गाडगेबाबा समाधीस्थळ, ऋणमोचन विकासासाठी २५ कोटी रुपये
  • श्री चक्रधर स्वामी महानुभाव संबंधित रिद्धपूर, काटोल, भिष्णूर, जाळीचा देव, पोहीचा देव, नांदेड, पांचाळेश्वर, पैठण विकासासाठी भरीव निधी
  • प्रज्ञाचक्षू संत गुलाबराव महाराज स्मारकासाठी भरीव निधी
  • गहिनीनाथ गडाच्या संवर्धन-विकासासाठी २५ कोटी रुपये
  • श्री संत जगनाडे महाराज आर्ट गॅलरी, नागपूर ६ कोटी रुपये
  • श्री संत जगनाडे महाराज समाधीस्थळ, सुदुंबरे (पुणे) २५ कोटी रुपये

(हेही वाचा Maharashtra Budget 2023-24: शिंदे-फडणवीस सरकारच्या पहिल्या अर्थसंकल्पातून मुंबईसाठी काय-काय?)

विविध स्मारकांसाठी तरतूद 

  • भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर इंदूमिल स्मारक : 349 कोटी रुपये दिले/आणखी 741 कोटी रुपये देणार
  • धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज तुळापूर आणि वढूबुद्रूक स्मारकांसाठी निधी
  • भिडेवाडा (पुणे) येथे ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले राष्ट्रीय स्मारक: 50 कोटी रुपये
  • लोकशाहीर अण्णाभाऊ साठे वाटेगाव (सांगली) स्मारक : 25 कोटी रुपये
  • हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्मारक : 351 कोटी रुपये
  • स्व. रा. सू. गवई स्मारक, अमरावती : 25 कोटी रुपये
  • विचारवंत कै. नरहर कुरुंदकर स्मारक, नांदेडसाठी निधी
  • स्व. शिवाजीराव देशमुख स्मारक, कोकरुड (सांगली) : 20 कोटी रुपये
  • राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या प्रेरणेने झालेल्या स्वातंत्र्यलढ्याच्या स्मृत्यर्थ आष्टी, वर्धा येथे स्मारक
  • विदर्भात झालेल्या जंगल सत्याग्रहाची तीन ठिकाणी स्मारके
  • मराठवाडा मुक्ती संग्रामाच्या अमृत महोत्सवानिमित्त पुरेसा निधी
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.