Maharashtra Budget 2023-24: शिंदे-फडणवीस सरकारच्या पहिल्या अर्थसंकल्पातून मुंबईसाठी काय-काय?

202

शिंदे-फडणवीस सरकारचा पहिला अर्थसंकल्प (Maharashtra Budget 2023-24) उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी विधीमंडळात सादर केला. देवेंद्र फडणवीस यांनी अर्थमंत्री म्हणून मांडलेला हा पहिलाचा अर्थसंकल्प असून फडणवीसांच्या या अर्थसंकल्पीय भाषणात अनेक मोठ्या घोषणा करण्यात आल्या आहेत. बोलण्यावर नाही, कृतीवर भर देत म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईच्या सुशोभिकरणासाठी १ हजार ७२९ कोटी रुपयांची तरतूद जाहीर करण्यात आली.

मुंबईचा सर्वांगीण विकासासाठी..

  •  मुंबईच्या सुशोभिकरणासाठी : १ हजार ७२९ कोटी रुपये
  • एमएमआर क्षेत्रात पारसिक हिल्स बोगदा, मीरा-भाईंदर पाणीपुरवठा, मुंबई पारबंदर प्रकल्प, विविध उड्डाणपूल यावर्षी पूर्ण करणार
  • ठाणे-वसई खाडी जलवाहतुकीने जोडणार: ४२४ कोटी रुपये
  • गेट वे ऑफ इंडियाजवळ रेडिओ क्लबनजीक प्रवासी जेट्टी, इतर सुविधांचे निर्माण : १६२.२० कोटी

मुंबई-पुणे मिसिंग लिंकच्या कामासाठी निधी

  • मुंबईत 337 कि.मी. मेट्रोचे जाळे/46 कि.मी. खुला/आणखी 50 कि.मी. यावर्षी खुला
    मुंबईतील नवीन प्रकल्प
  • मुंबई मेट्रो 10 : गायमुख ते शिवाजी चौक मीरा रोड/9.2 कि.मी/4476 कोटी
  • मुंबई मेट्रो 11 : वडाळा ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस/12.77 कि.मी/8739 कोटी रुपये
  • मुंबई मेट्रो 12 : कल्याण ते तळोजा/20.75 कि.मी/5865 कोटी रुपये

(हेही वाचा – Maharashtra Budget Session : लेक लाडकी योजना, एसटी प्रवासात ५० टक्के सूट! सारे काही महिलांसाठी…)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.