राज्याचे अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरूवारी राज्याचा अर्थसंकल्प सादर केला. उपमुख्यमंत्र्यांनी सादर केलेला यंदाचा अर्थसंकल्प हा पंचामृत ध्येयांवर आधारित असणार आहे. देशाच्या अमृत काळातील हा पहिला अर्थसंकल्प असून तो पंचामृत ध्येयांवर आधारित आहे. मात्र शेवटच्या मुद्द्याकडे वळण्याआधी पंचामृत योजनेमधील मुद्द्यांचा अमृत असा उल्लेख करत देवेंद्र फडणवीस यांनी मजेदार विधान केले.
( हेही वाचा : ‘गाजर हलवा अर्थसंकल्प’; शिंदे-फडणवीस सरकारच्या अर्थसंकल्पाचे उद्धव ठाकरेंनी एका वाक्यात केले वर्णन)
जवळपास १ तास करण्यात आलेल्या अर्थसंकल्पीय भाषणानंतर फडणवीस पंचामृत धोरणातील शेवटच्या मुद्द्याकडे वळले. यावेळी फडणवीस काही सेकंद थांबले आणि त्यांनी खिशातून रुमाल काढला. चष्मा काढून चेहरा पुसला आणि ते पुन्हा बोलू लागले. यावेळी ते म्हणाले “यानंतर मी पंचामृतांपैकी पंचम अमृताकडे वळतो” त्यावर एका सदस्याने त्यांना पंचम अमृत शब्दाऐवजी पंचामृत शब्द वापरण्याचा सल्ला दिला. त्यानंतर पीठासीन अधिकाऱ्यांनी बेल वाजवून सर्वांना शांत राहण्याची सूचना केली.
अन् सभागृहात एकचं हशा पिकला
त्यानंतर फडणवीस म्हणाले, कसं आहे मला सावधानतेने बोलावं लागतंय कारण आता अमृताकडे वळतो म्हटल्यावर तुम्ही काहीतरी भलताच अर्थ काढाल असे फडणवीस यांनी म्हटले आणि सभागृहात एकचं हशा पिकला. काही सेकंद पॉज घेतल्यावर त्यांनी पुढील भाषण सुरू केले.
Join Our WhatsApp Community