महाराष्ट्राचे अर्थमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी शुक्रवारी (२८ मे) विधानसभेत 2024-25 या आर्थिक वर्षासाठी अर्थसंकल्प (Maharashtra Budget 2024) सादर केला. पुढच्या तीन महिन्यांनी महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. त्यामुळे या अर्थसंकल्पीय अधिवेशनाकडे राज्याच्या नागरिकांचं विशेष लक्ष होतं. अजित पवार यांनी आज मांडलेल्या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा करण्यात आली आहे. (Maharashtra Budget 2024)
शेतकऱ्यांना गेल्यावर्षी कापूस आणि सोयाबीनला अपेक्षित भाव न मिळाल्यामुळे शेतकरी त्रस्त होते. पण शेतकऱ्यांच्या मनस्तापाचा विचार करुन सरकारने शेतकऱ्यांसाठी मोठ्या घोषणा केल्या आहेत. “कापूस आणि सोयाबीन पिकाचा राज्याच्या उत्पन्नात वाटा आहे. गेल्यावर्षी आंतरराष्ट्रीय घडामोडींमुळे नुकसान सोसावं लागलं होतं. आता शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी ५ हजार रुपये देण्याचा निर्णय घेतला जाणार आहे. मागेच कॅबिनेटने निर्णय घेतला होता. पण आचारसंहिता लागली होती. आता कापूस सोयाबीन शेतकऱ्यांना पाच हजार देणार आहोत. कांदा कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी २०० कोटी रुपयांचा फिरता निधी तयार केला जाणार आहे.” अशी मोठी घोषणा अर्थमंत्री अजित पवार यांनी केली. (Maharashtra Budget 2024)
अर्थसंकल्पातून शेतकऱ्यांना काय मिळालं? (Maharashtra Budget 2024)
- गाई दूध उत्पादक शेतकऱ्यांना आधार देण्यासाठी प्रति लिटर 5 रुपयाचे अनुदान 1 जुलैपासून देण्यात येणार.
- येत्या दोन वर्षात 163 सिंचन प्रकल्प पूर्ण होतील
- सिंचन प्रकल्प पूर्ण करण्यासाठी नाबार्ड करून 15,000 कोटींचं दीर्घकालीन कर्ज मंजूर झालेला आहे.
- 3200 कोटी रुपयांचा कार्यक्रम दुष्काळी भागात पाणी पोहचवण्याचा राबविण्यात येणार आहे.
- शेतकरी यांना दिवसा विज पुरवठा करण्यासाठी 15,000 कोटी रुपयांची व्यवस्था करण्यात येत आहे.
- मागेल त्याला सौरपंप दिला जाणार आहे.
- अभ्यासक्रम पुर्ण करणारे तरुण जास्त आहे.
- 10 हजार रुपये विद्यावेतन दिल जाईल.
- संजय गांधी निराधार योजनेला 1 हजारावरुन दीड हजार रुपयांच अनुदान मिळालं.
- शेती कृषी पंपाचे सर्व थकित बील माफ करण्यात आलंय.
- नवीन रुग्न वाहिका खरेदी केल्या जातील.
- मुख्यमंत्री अन्नपुर्णा योजना राबवली जाईल.
- मुंबई किनारी मार्गाच काम जवळपास पूर्ण झालेलं आहे. दोन्ही मार्गिका खुल्या केलेल्या आहेत.
- रायगड किल्यावर शिवराज्याभिषेक सोहळा दरवर्षी साजरा केला जाईल, त्याचा खर्च राज्य सरकार करणार आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community