राज्याचे वित्तमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी शुक्रवारी विधानसभेमध्ये सरकारचा 2024-25 या वर्षासाठीचा अर्थसंकल्प (Maharashtra Budget 2024) सभागृहात सादर केला. लोकसभा निवडणुकीत झालेल्या महायुतीच्या पराभवामुळे आगामी विधानसभा निवडणूक डोळ्यांसमोर ठेवून राज्य सरकारने या अर्थसंकल्पामधून जनतेसाठी उपयुक्त योजनांची घोषणा केली आहे. या अर्थसंकल्पामध्ये महिलांना केंद्रस्थानी ठेवून काही घोषणा केल्या आहेत. त्यानुसार शुक्रवारी अर्थसंकल्प सादर करताना अजित पवार यांनी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची (CM Ladki Bahin Yojana) घोषणा केली आहे. यासोबतच इतर मागासवर्ग आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील मुलींना शिक्षणशुल्क (EWS) आणि परीक्षा शुल्कात 100 टक्के आर्थिक मदत करण्यात येणार आहे. (Maharashtra Budget 2024)
(हेही वाचा – Budget 2024: ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण’ योजनेची अजित पवार यांच्याकडून घोषणा, काय आहेत फायदे ? जाणून घ्या…)
विधानसभेच्या 2024 च्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच 28 जून रोजी उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार यांनी लोकपयोगी घोषणांचा पाऊस पाडला आहे. यामध्ये महिलांसाठी विविध योजना सरकारतर्फे जाहीर करण्यात आल्या आहेत. राज्यातील व्यावसायिक शिक्षण अभ्यासक्रमांमध्ये मुलींची संख्या वाढवण्यासाठी सरकार कटिबद्ध असल्याचे अजित पवार म्हणाले. अभियांत्रिकी, वास्तूशास्र, वैद्यकीय तसंच कृषीविषयक अभ्यासाठी प्रवेशित 8 लाखांपर्यंत उत्पन्न असलेल्या इतर मागासवर्ग आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील मुलींना शिक्षणशुल्क आणि परीक्षा शुल्कात 100 टक्के आर्थिक मदत केली जाईल. या निर्णयाचा लाभ 2 लाख 5 हजार मुलींना होईल. शैक्षणिक वर्ष 2024-25 पासून योजना लागू केली जाईल. यासाठी 2 हजार कोटींचा भार राज्य सरकार दरवर्षी उचलणार आहे असे अजित पवार यांनी सांगितले. (Maharashtra Budget 2024)
हेही पाहा –
Join Our WhatsApp Community