Maharashtra Budget 2024 : सरकार देणार ३ गॅस सिलिंडर मोफत; कोण असतील अन्नपूर्णा योजनेची पात्र कुटुंबे ?

Maharashtra Budget 2024 : विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर अर्थमंत्र्यांनी मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेची घोषणा केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वतः या योजनेसाठी आग्रही होते.

314
Maharashtra Budget 2024 : सरकार देणार ३ गॅस सिलिंडर मोफत; कोण असतील अन्नपूर्णा योजनेची पात्र कुटुंबे ?
Maharashtra Budget 2024 : सरकार देणार ३ गॅस सिलिंडर मोफत; कोण असतील अन्नपूर्णा योजनेची पात्र कुटुंबे ?

आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर अर्थमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्पात मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेची घोषणा केली आहे. या योजनेंतर्गत राज्यभरातील पात्र कुटुंबांना दरवर्षी 3 गॅस सिलिंडर मोफत मिळणार आहेत. या घोषणेमुळे महिलांची चुलीच्या धुरापासून सुटका होईल, असा विश्वास अर्थमंत्र्यांनी व्यक्त केला आहे. मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना (CM Annapurna Yojana) पर्यावरण संरक्षणाला सहाय्यक ठरेल. (Maharashtra Budget 2024)

(हेही वाचा – Vikhe Patil : वाळू धोरणामध्‍ये अधिक सुलभता आणण्‍यासाठी शासन कटिबद्ध – महसूल मंत्री विखे पाटील)

गेल्या काही वर्षांमध्ये वाढत्या महागाईमुळे सर्वसामान्यांचे पार कंबरडे मोडले आहे. त्यामुळे निर्माण झालेल्या नाराजीचा फटका महायुती सरकारला लोकसभा निवडणुकीत (Loksabha Election 2024) बसला. आता विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर अर्थमंत्र्यांनी मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेची घोषणा केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वतः या योजनेसाठी आग्रही होते.

स्वयंपाकासाठी वापरल्या जाणाऱ्या इंधनाचा व महिलांच्या आरोग्याचा जवळचा संबंध आहे. महिलांच्या आरोगाच्या नियमित तक्रारी कमी करण्यासाठी त्यांना स्वच्छ इंधन पुरवणे ही आपली जबाबदारी आहे. त्यासाठी एलपीजी इंधनाचा पुरवठा करणे गरजेचे आहे. सर्वच कुटुंबांना गॅस सिलिंडर परवडेल, यासाठी सरकारने राज्यभरातील पात्र कुटुंबांना दरवर्षी 3 गॅस सिलिंडर मोफत देण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी सरकार मुख्यमंत्री अन्नपूर्ण योजना राबवणार आहे, असे अजित पवार (Ajit Pawar) अर्थसंकल्प सादर करताना म्हणाले.

कोण आहेत पात्र कुटुंबे

या योजनेचा लाभ 52 लाख 16 हजार 412 कुटुंबांना या योजनेचा लाभ मिळेल, असे अजित पवार यांनी स्पष्ट केले. अर्थमंत्र्यांनी ही योजना सादर करताना ‘पात्र कुटुंब’ असा उल्लेख केला. त्यामुळे त्याचा लाभ कुणाला मिळणार हे नंतर स्पष्ट होईल.

अजित पवार यांनी शुक्रवारी महाराष्ट्राचा अतिरिक्त अर्थसंकल्प सादर केला. त्यात त्यांनी आगामी विधानसभा डोळ्यांपुढे ठेवून विविध योजनांची घोषणा केली. यात त्यांनी महिलांची चुलीच्या धुरापासून सुटका करण्यासाठी मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेची घोषणा केली. (Maharashtra Budget 2024)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.