Maharashtra Budget 2024: त्यांनी अडीच वर्ष लाडका बेटा योजना राबवली; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना खोचक टोला!

276
Maharashtra Budget 2024: त्यांनी अडीच वर्ष लाडका बेटा योजना राबवली; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना खोचक टोला!
Maharashtra Budget 2024: त्यांनी अडीच वर्ष लाडका बेटा योजना राबवली; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना खोचक टोला!

राज्यात 2024 च्या पावसाळी अधिवेशनाला (Monsoon session 2024) सुरूवात झाली आहे. यामध्ये दुसऱ्या दिवशी म्हणजेच 28 जून रोजी अंतरिम बजेट सादर करण्यात आले. यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पात अनेक समर्पित योजनांची घोषणा करण्यात आली. अजित पवार यांनी शुक्रवारी अर्थसंकल्प (Budget 2024) सादर करत असताना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची घोषणा केली. या योजनेच्या माध्यमातून सरकार 21 ते 60 वयोगटाच्या महिलांना दर महिन्याला 1500 रुपये देणार असल्याची घोषणा उपमुख्यमंत्र्यांनी केली. “महिलांसाठी लाडकी लेक आणि लाडकी बहीण या योजना आणत असाल तर जरुर आणा. पण मुलगा आणि मुलगी असा भेदभाव करु नका. मुलींसाठी काही आणत असाल तर मुलांसाठीदेखील काही आणा”, असे उबाठा गटाचे गटप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) म्हणाले. उद्धव ठाकरे यांच्या या वक्तव्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली. (Maharashtra Budget 2024)

अडीच वर्ष त्यांनी लाडला बेटा योजना राबवली…

लाडकी बहीण योजनेवर टीका करताना उद्धव ठाकरे यांनी म्हटले की, लाडका भाऊ योजना का राबवत नाही. यावर बोलताना मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, आम्ही लाडका भाऊ योजना केली आहे. १० हजार रुपये देत आहोत. पण त्यांनी अडीच वर्षे लाडका बेटा योजना राबवली, त्याचे काय, असा खोचक सवाल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी केला. शेतकऱ्यांसाठी अनेक योजना राबवल्या. राज्यातील सर्व मुलींचे शिक्षण मोफत करण्यात येत आहे. अजित पवार यांनी अर्थसंकल्प मांडलेला आहे. अजितदादा वाद्याला पक्के आहेत. त्यामुळे हे सरकार दिलेला शब्द पाळणारे आहेत. आतापर्यंत जे जे बोललो, ते ते पूर्ण करून दाखवले आहे, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्टपणे सांगितले. (Maharashtra Budget 2024)

(हेही वाचा – T20 World Cup, Ind vs SA : आतापर्यंत फ्लॉप ठरलेल्या विराट कोहलीची रोहित आणि द्रविडकडून पाठराखण)

दरम्यान, अर्थसंकल्पात सर्व पैशांची तरतूद करून या सर्व योजना केलेल्या आहेत. या योजना पूर्णपणे राबवल्या जातील. दुधाला ५ रुपये वाढ केली आहे. सोयाबीन आणि कापसाला साडेचार हजार कोटींची तरतूद केलेली आहे. शेतकऱ्यांना काय दिले, हे विचारणाऱ्यांना सांगू इच्छितो की, गेल्या दोन वर्षांत सगळे निकष बदलून, विविध योजनांच्या माध्यमातून ४५ हजार कोटी रुपये शेतकऱ्यांना दिले. खोटे बोला पण रेटून बोला, हेच विरोधकांचे धोरण राहिले आहे, अशी टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी केली.   (Maharashtra Budget 2024)

हेही पाहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.