सरकारच्या चहापानाला जाऊन त्यांच्या पापाचे वाटेकरी होणार नाही, असा हल्लाबोल करत महाविकास आघाडीने सरकारच्या चहापानावर बहिष्कार टाकण्याची भूमिका घेतल्याचे विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार,अंबादास दानवे, यांनी रविवारी पत्रकार परिषदेत जाहीर केले. महाराष्ट्र राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला २६फेब्रुवारी पासून सुरुवात होणार आहे. विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. अर्थसंकल्पीय अधिवेशन एक मार्चपर्यंत चालणार आहे. या अधिवेशनात राज्य सरकार अर्थसंकल्प सादर करेल. अर्थमंत्री अजित पवार यंदाचा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. हे निवडणुकीचे वर्ष असल्याने राज्य सरकार अर्थसंकल्पाच्या माध्यमातून कोणत्या महत्त्वाच्या घोषणा करणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
अधिवशेनाच्या पूर्वसंध्येला सरकारकडून आयोजित चहापानासंदर्भात व अधिवेशनात सरकार विरोधात रणनीती आखण्यासाठी विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्या मुंबईतील शासकीय निवास्थानी एका बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत यावेळी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, विधीमंडळातील काँगेसचे गटनेते बाळासाहेब थोरात,राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अनिल देशमुख,शिवसेनेचे सुनिल प्रभू,काँग्रेसचे भाई जगताप, समाजवादी पक्षाचे अबू आझमी, शेकापचे जयंत पाटील आदी उपस्थित होते. (Maharashtra Budget 2024)
(हेही वाचा – Prime Minister Narendra Modi: पंतप्रधानांनी गुजरातमधील द्वारका येथे केले विविध विकास प्रकल्पांचे लोकार्पण आणि भूमिपूजन)
वडेट्टीवार म्हणाले की, महाराष्ट्राची राजकीय परंपरा सुसंस्कृत आहे. परंतु या सरकारच्या काळात राजकारणातील गुन्हेगारी वाढली आहे. प्रक्षोभक विधान करून, चिथावणीखोर भाषण करू राजकीय वातावरण काही लोकप्रतिनीधी गढूळ करतात. खुलेआम स्टेजवरून माता-भगिनी विषयी काहीही बोलले तरी देखील सरकार त्यांना पाठीशी घालते आहे. गुंडांना पोसण्याचे काम प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे सरकार करत असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला. (Maharashtra Budget 2024)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community